मुंबई

बंडखोरांवर कारवाई झाली पाहिजे - मीनाक्षी शिंदे

CD

युतीधर्म न पाळणाऱ्या
बंडखोरांवर कारवाई करा ः मीनाक्षी शिंदे
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २० : पालिका निवडणुकीत पक्षविरोधी भूमिका घेत, युतीधर्म न पाळता बंडखोरी करून ५७ जणांनी यापूर्वी अपक्ष उमेदवारी दाखल केली होती. त्यांच्यावर सहा वर्षांचे निलंबन करण्यात आले होते. तशीच कारवाई यंदाच्या पार पडलेल्या निवडणुकीत बंडखोरी केलेल्यांवर करण्यात यावी अशी मागणी शिंदे सेनेच्या महिला आघाडी प्रमुख तसेच नगरसेविका मीनाक्षी शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली. तसेच अशा व्यक्तींना कोणत्याही पदावर सामावून घेतले जाणार नसल्याचेदेखील त्यांनी स्पष्ट करीत बंडखोरांचा त्यांनी चांगलाच समाचार शुक्रवारी (ता. २०) घेतला.
ठाणे महापालिकेवर चार वर्षे प्रशासकीय राजवट असल्याने लोकप्रतिनिधींना प्रत्यक्ष काम करता आले नाही. मात्र, नव्याने निवडून आलेले नगरसेवक उत्साही असून, याच महिन्यापासून कामांना गती मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सध्या सर्व नगरसेवकांचे पत्रव्यवहार सुरू झाले असून, प्रलंबित कामे लवकरच मार्गी लागतील, असेही त्यांनी नमूद केले.
अनेक ज्येष्ठ नगरसेवक पुन्हा निवडून आले असून, काही प्रभागांमध्ये अनेक वर्षे काम करणारे कार्यकर्ते नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. रस्त्यांची कामे, भटक्या श्वानांच्या तक्रारी यांसारखे विषय या महासभेत न येता पुढील महासभेत चर्चेला येतील. चार वर्षांत रखडलेली कामे मार्गी लावण्यासाठी सर्वच लोकप्रतिनिधी प्रयत्नशील असतील, असेही त्यांनी सांगितले.

स्थायी समितीच्या सदस्यांची निवड
महासभा तहकूब झाली असली तरी पुढील महासभेत स्थायी समितीच्या १६ सदस्यांची नावे जाहीर केली जातील. त्यानंतर समिती सभापतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गुन्हेगारासोबत खाकीची दोस्ती? आरोपी अयानला पोलीसच भरवतायत केक; लैंगिक अत्याचार प्रकरणातील व्हिडिओमुळे खळबळ

Gold Rate Today: अक्षय तृतीयेआधीच सोनं स्वस्त! भाव आजून वाढणार? जाणून घ्या आजचे ताजे दर

Electric Shock Death : साकोरा हादरलं! वीज पंप सुरू करताना दोन शेतकऱ्यांचा दुर्दैवी अंत; एकाच्या मुलीचं लग्न, तर दुसऱ्यानं यापूर्वीही सोसलेलं नियतीचं चक्र

'मला बाळ हवय, तु फक्त स्पर्म डोनेट कर' राकेश बापटच्या प्रेमात पूर्ण वेडी झाली राखी, म्हणाली...'माझं त्यांच्यावर खरंच मनापासून...'

Mango Price Drop : आंब्याच्या दरात घसरण! ८० हजार पेट्यांची आवक, अक्षय तृतीयेला आंबा खवय्यांची हापूस मेजवाणी

SCROLL FOR NEXT