क्रीडा महोत्सवात अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सहभाग
जव्हार, ता. २१ (बातमीदार) : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, जव्हारअंतर्गत प्रकल्पस्तरीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आयोजित दोनदिवसीय क्रीडा महोत्सव जल्लोषात पार पडला. १६ व १७ फेब्रुवारीला जव्हार येथील राजीव गांधी स्टेडियम येथे रंगलेल्या या स्पर्धांमध्ये सुमारे ५०० अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
या महोत्सवाचे उद्घाटन विक्रमगड विधानसभेचे आमदार हरिश्चंद्र भोये यांच्या हस्ते झाले. या वेळी जव्हार नगर परिषदेच्या नगराध्यक्षा पूजा उदावंत तसेच ज्योती भोये यांचीही उपस्थिती लाभली. आमदार भोये यांनी आपल्या मनोगनातून क्रीडा ही शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच संघभावना, शिस्त आणि नेतृत्वगुण जोपासणारे प्रभावी माध्यम असल्याचे प्रतिपादन केले. शासकीय यंत्रणेत सकारात्मकता आणि परस्पर समन्वय वाढवण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली. या क्रीडा स्पर्धेत शासकीय व अनुदानित आश्रमशाळा, शासकीय मुलामुलींची वसतिगृहे तसेच सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते. सांघिक प्रकारात क्रिकेट, कबड्डी, व्हॉलीबॉल व हँडबॉल तर वैयक्तिक प्रकारात धावणे, भालाफेक, गोळाफेक, बॅडमिंटन, कॅरम व बुद्धिबळ अशा एकूण १० स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
या यशस्वी आयोजनामागे प्रकल्प अधिकारी डॉ. अपूर्वा बासूर यांचे नियोजनबद्ध नेतृत्व आणि मार्गदर्शन महत्त्वपूर्ण ठरले. त्यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या महोत्सवामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये आपुलकी, सुसंवाद आणि कार्यक्षमता वृद्धिंगत होण्यास निश्चितच चालना मिळाली आहे. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजक समितीचे मान्यवरांनी विशेष कौतुक केले. सर्व सहभागी खेळाडूंनी उत्कृष्ट क्रीडाभावना जपत आपली सर्वोत्तम कामगिरी सादर करावी, अशा शुभेच्छा देत महोत्सवाची सांगता उत्साहपूर्ण वातावरणात झाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.