मुंबई

कापूस खरेदीला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी

CD

कापूस खरेदीला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ द्या
माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ ः राज्याचे माजी मंत्री, आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी २०२५-२६ हंगामातील कापूस खरेदीला मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे. खरेदीसाठी जाहीर करण्यात आलेली २७ फेब्रुवारी ही अंतिम मुदत ३१ मार्चपर्यंत वाढविण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. यासोबतच सीसीआय मुंबईचे चेअरमन ललितकुमार गुप्ता यांच्याकडेही निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे, की भारतीय कपास निगम लिमिटेड (सीसीआय)मार्फत एमएसपीअंतर्गत कापूस खरेदीची अंतिम तारीख २७ फेब्रुवारी निश्चित करण्यात आली आहे. कपास किसान ॲपवर नोंदणीकृत शेतकऱ्यांना या मुदतीपूर्वी स्लॉट बुक करून जवळच्या खरेदी केंद्रावर कापूस विक्री करण्याचे आवाहन करण्यात आले आहे; मात्र राज्यातील अनेक भागांत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीत अद्याप ओलावा कायम असून कापूस वेचणी व काढणीला विलंब होत आहे. चंद्रपूर जिल्ह्यासह विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने अनेक शेतकऱ्यांच्या घरी अजून कापूस पोहोचलेला नाही. त्यामुळे ते एमएसपी योजनेचा लाभ घेण्यापासून वंचित राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

या परिस्थितीची तातडीने दखल घेत मुदतवाढीची मागणी त्यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर कृषी मूल्य आयोगाचे सदस्य बंडू मधुकर गौरकार यांनी सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन दिले आहे. त्याची दखल घेत, मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवत मुदतवाढीची मागणी केली आहे. तसेच, संबंधित विभागांना तातडीने निर्देश देऊन आवश्यक कार्यवाही करण्याची विनंतीही करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ट्रकची पोलिसांच्या गाडीला धडक, ५ जणांचा मृत्यू; तिघांची प्रकृती गंभीर

Suryakumar Yadav: भारतीय संघाच्या तयारीवर सूर्यकुमार यादवचा विश्वास; अभिषेक शर्माच्या फटाक्याची तयारी

Latest Marathi News Live Update : राजापूर किनाऱ्यावर स्फोटासारख्या आवाजांमुळे खळबळ; टगबोटीवरील सिग्नल पिस्टल फायरिंगचा प्रकार उघड

पुणे–सातारा महामार्गावर २४ तासांत दुसरा अपघात; आधी ट्रक उलटला, आता टेम्पो अन् ट्रकची धडक; एकाचा मृत्यू

श्रद्धा कपूर अंबाबाईचरणी नतमस्तक, कोल्हापुरात जाऊन घेतलं देवीचं दर्शन, VIRAL VIDEO

SCROLL FOR NEXT