धारावीतील रस्ते झाले स्वच्छ
धारावी, ता. २१ (बातमीदार) : धारावीतील अंतर्गत रस्त्यांवर साचलेल्या कचऱ्याबाबत प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची अखेर पालिका प्रशासनाने दखल घेतली असून प्रमुख रस्त्यांवरील कचरा उचलून परिसर स्वच्छ करण्यात आला आहे.
धारावीतील ९० फूट रस्ता, ६० फूट रस्ता तसेच धारावी मुख्य रस्ता येथे अनेक दिवसांपासून ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे साचले होते. दुर्गंधीमुळे नागरिकांना नाक मुठीत धरून जावे लागत होते. वाहतुकीलाही अडथळे निर्माण होत होते. स्थानिक रहिवासी, पादचारी आणि वाहनचालक यांच्यातून तीव्र नाराजी व्यक्त केली जात होती.
या समस्येबाबत ‘सकाळ’च्या रविवारच्या (ता. १५) अंकात ‘धारावीत रस्त्यावर कचऱ्याचे साम्राज्य’ या मथळ्याखाली सविस्तर वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर पालिकेच्या संबंधित विभागाने तत्काळ हालचाल करत रस्त्यांवरील कचरा उचलण्याची मोहीम राबवली. सध्या प्रमुख मार्ग स्वच्छ करण्यात आले असून वाहतूक सुरळीत झाली आहे.
९० फूट रस्त्यावर अनेकदा कचरा दिवसेंदिवस पडून राहत असल्याची तक्रार स्थानिकांनी केली होती. कचऱ्यामुळे विविध आजारांचा प्रादुर्भाव वाढण्याची भीतीही व्यक्त केली जात होती. नुकत्याच झालेल्या पालिका निवडणुकीत निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनीही या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. ‘स्वच्छ मुंबई, सुंदर मुंबई’च्या घोषणेला साजेशी कार्यवाही कायम राहावी आणि पुन्हा अशी परिस्थिती निर्माण होऊ नये, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.