मुंबई

मराठी चित्रपट महोत्सवासाठी प्रवेश अर्ज पाठवण्याचे आवाहन

CD

मराठी चित्रपट महोत्सवासाठी प्रवेश अर्ज पाठवण्याचे आवाहन
मुंबई, ता. २२ ः नारायण देसाई संस्थेच्या वतीने यंदाही ‘मातृभाषा सन्मान पुरस्कार सोहळा’ मराठी चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. गुणवंत कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या कामाचा गौरव करणे, हा या पुरस्कारामागील मुख्य हेतू आहे. चित्रपटसृष्टीतील मान्यवरांच्या उपस्थितीत मे महिन्यात मुंबईत पुरस्कार सोहळा पार पडणार आहे.
या मराठी चित्रपट महोत्सवात १ जानेवारी २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४ तसेच १ जानेवारी २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत सेन्सॉर झालेले किंवा प्रदर्शित झालेले मराठी चित्रपट सहभागी होऊ शकतात. इच्छुक निर्माते, दिग्दर्शक व संबंधितांनी आपले प्रवेश अर्ज ३० मार्चपर्यंत सादर करण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष आर्यन देसाई यांनी केले आहे. या सोहळ्यात सर्वोत्कृष्ट सिनेपत्रकार, जीवनगौरव, विशेष योगदान, सर्वोत्कृष्ट चित्रपट, सामाजिक चित्रपट, विनोदी चित्रपट, दिग्दर्शक, कथा, पटकथा, संवाद, अभिनेता, अभिनेत्री, विनोदी/सहाय्यक अभिनेता, विनोदी/सहाय्यक अभिनेत्री, छायांकन, संकलन, रंगभूषा, संगीतकार, गीतकार, पार्श्वगायक, पार्श्वगायिका, कला दिग्दर्शक, पार्श्वसंगीत, बालकलाकार तसेच पदार्पण (दिग्दर्शक, अभिनेता, अभिनेत्री) अशा विविध मानाच्या पुरस्कारांनी चित्रपट क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी संस्थेशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SL vs ENG, T20 WC: अनपेक्षित निकाल! श्रीलंकन ढेपाळले, इंग्लडचा Super 8 मध्ये एकतर्फा विजय; पाकड्यांच्या मनात घबराट...

Buldhana Shivaji Maharaj Statue Row : चिखला गावचे फरार सरपंच Ganesh Kakad कोण? पहिल्यांदाच समोर येत व्हिडिओद्वारे दिली प्रतिक्रिया

Shikhar Dhawan चं दुसरं लग्न; रोहित शर्मा, चहलची उपस्थिती, तर विराट-रहाणेच्या कमेंटने वेधले लक्ष

SL vs ENG, T20 WC: W,W,W,W,W ! श्रीलंकेचा निम्मा संघ ३४ धावांत तंबूत; इंग्लंडच्या पार्टटाईम फिरकीपटू विल जॅक्सने वाढवली डोकेदुखी

Pune News: रुग्णांच्या जिवाशी खेळ, निकृष्ट औषधे वितरित; थेरगाव रुग्णालयातील प्रकार, तब्बल १६ हजार गोळ्यांची बॅच परत, चौकशीचे आदेश!

SCROLL FOR NEXT