मुंबई

गुंतवणुकीच्या आमिषाने व्यावसायिकाला ५.१५ कोटींचा गंडा

CD

गुंतवणुकीच्या प्रलोभनाने व्यावसायिकाला ५.१५ कोटींचा गंडा
खासगी कंपनीच्या दोन संचालकांविरुद्ध गुन्हा; तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे
अंधेरी, ता. २१ (बातमीदार) : गुंतवणुकीच्या नावाखाली बोरिवलीतील एका रिअल इस्टेट व्यावसायिकाची पाच कोटी १५ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कस्तुरबा मार्ग पोलिसांनी खासगी कंपनीच्या दोन संचालकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून, तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. मनसुख शाह आणि आकाश मनसुख शाह अशी आरोपींची नावे आहेत. त्यांनी अशाच प्रकारे इतर काही व्यावसायिकांची सुमारे १४ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचीही चर्चा आहे.
तक्रारदार हे बोरिवली परिसरात राहणारे रिअल इस्टेट कन्स्ट्रक्शन व्यावसायिक असून, त्यांची कंपनी एसआरए पुनर्विकास प्रकल्पांवर काम करते. मार्च २०२५मध्ये त्यांची आरोपींशी ओळख झाली होती. आरोपींची शाह हाऊसकॉन प्रायव्हेट लिमिटेड या नावाची कंपनी असून, ते दोघेही संचालक म्हणून कार्यरत होते. आरोपींनी मालाड येथील राणी सती मार्गावरील खोतडोंगरी सहकारी सोसायटीच्या एसआरए प्रकल्पात गुंतवणूक करण्याची ऑफर दिली. सविस्तर चर्चेनंतर दोन्ही पक्षांत करार व सामंजस्य करार (एमओयू) झाला. करारानुसार तक्रारदारांनी मे ते जुलै २०२५ दरम्यान पाच कोटी १५ लाख रुपये आरोपींच्या कंपनीकडे अदा केले. मात्र करारातील अटीप्रमाणे झोपडपट्टी रिकामी करणे, प्रकल्पाचे टायटल क्लिअर करणे, तृतीय पक्षांशी समन्वय साधणे आदी कोणतीही कामे आरोपींकडून करण्यात आली नाहीत. चौकशीत आरोपींनी इतर व्यावसायिकांसोबतही अशाच प्रकारे बोगस करार करून मोठी रक्कम उकळल्याचे समोर आले. तसेच काही झोपडीधारकांची नोंद बोगस असल्याचेही निदर्शनास आले. संबंधितांना भाडे देण्यास सुरुवात करून नंतर ते बंद केल्याने काहींनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याची माहितीही समोर आली आहे. याबाबत विचारणा केल्यावर आरोपींनी तक्रारदारांना प्रकल्पातून बाहेर काढण्याची तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे.
हा प्रकार लक्षात येताच तक्रारदारांनी कस्तुरबा मार्ग पोलिसांत तक्रार दाखल केली. प्राथमिक चौकशीनंतर मनसुख शाह व आकाश शाह यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला असून, या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याने तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG वर संकट की दिलासा? होर्मुझ तणावातही सरकारचं मोठं आश्वासन; तुमच्या घरच्या गॅसबद्दल जाणून घ्या सत्य!

MI vs PBKS Live: आई, शप्पथsss...! श्रेयस अय्यरचा अविश्वसनीय झेल पाहून रोहित शर्मा अवाक्... सूर्याचे डोळे विस्फारले... IPL2026 मधील बेस्ट कॅच

Latest Marathi News Live Update : जेव्हा कधी काहीतरी चांगले घडते, तेव्हा विरोधक तक्रारी करतातच, नारी शक्ती वंदन विधेयकावर कंगना रानौत यांची प्रतिक्रिया

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकचे शतक, मोडला MS Dhoni चा विक्रम! युझवेंद्र चहलची एक चूक अन् पंजाब किंग्सच्या मेहनतीवर पाणी

Aarey Milk: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! ‘आरे’ दूध पुन्हा बाजारात येणार, तारीख आली समोर, स्टॉलधारकांना दिलासा

SCROLL FOR NEXT