मुंबई

महाआरोग्य शिबिरात १७५ रुग्णांची तपासणी

CD

ठाणे, ता. २१ (बातमीदार) : सामाजिक बांधिलकीची जाणीव आणि आरोग्य सेवेचा ध्यास यांचा संगम साधत शिवजयंती; तसेच संत सेवालाल महाराज जयंतीनिमित्त महाआरोग्य शिबिर उत्साहात पार पडले. दि ग्रेट सातारा सांगली सेवा समिती (रजि.) आणि डायसण फाउंडेशन (एनजीओ) यांच्या संयुक्त विद्यमाने; तसेच ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या सहकार्याने हा लोकहितवादी उपक्रम राबविण्यात आला.
शिबिराचे उद्‍घाटन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व संत सेवालाल महाराजांच्या प्रतिमेला गोर परंपरेनुसार भोग अर्पण करण्यात आले. या वेळी राम रेपाले (सचिव, शिवसेना), विजय यादव (अध्यक्ष, वाहतूक सेना ठाणे जिल्हा), पंकज सिरसाट (पोलिस उपायुक्त, वाहतूक शहर, ठाणे) यांची प्रमुख उपस्थिती लाभली. डायसण फाउंडेशनचे संचालक डॉ. अतुल तारासिंग राठोड, वैशाली राठोड, प्रकाश सूर्यवंशी (संस्थापक अध्यक्ष) आणि उत्तम सूर्यवंशी (अध्यक्ष, ठाणे जिल्हा) उपस्थित होते. महाआरोग्य शिबिरात सुमारे १७५ रुग्णांनी विविध तपासण्या व उपचारांचा लाभ घेतला. स्त्रीरोग, अस्थिरोग, बालरोग, नेत्र व दंत तपासणीसह रक्तदाब, साखर, कोलेस्टेरॉल, ईसीजी आदी तपासण्या मोफत करण्यात आल्या. नेत्रतपासणीनंतर पात्र लाभार्थ्यांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले. तसेच ई-श्रम कार्ड व आयुष्मान भारत कार्ड नोंदणीसाठी नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. जिल्हा सामान्य रुग्णालयातील ३२ डॉक्टर, तज्ज्ञ व कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Heatwave: पुणे परिसरात उष्णतेचा तडाखा; लोहगावचा पारा ४२ अंशांवर, तापमान आणखी वाढणार, अंगाची लाहीलाही..

मृण्मयी देशपांडेचं चालतं फिरतं घर पाहिलत का? आता महिनाभर तिथेच राहणार, Viral Video

Kolhapur Gokul Politics : पंधरा दिवसांपूर्वी रुजू झालेले सहायक दुग्ध निबंधक कदम यांची तडकाफडकी बदली, गोकुळचे राजकारण तापलं; मुश्रीफांना अप्रत्यक्ष दणका

Latest Marathi News Live Update: राष्ट्रीय महिला आयोगाची टीम आज नाशिकमध्ये येणार

IPL 2026: कोलकता संघाला पहिल्या विजयाची प्रतीक्षा; गुजरातशी आज अहमदाबादमध्ये लढणार, रहाणेच्या नेतृत्वाचा कस, कशी असेल Playing XI

SCROLL FOR NEXT