मुंबई

''फिट मुंबई''अंतर्गत वांद्रे येथे ''फिट सॅटर्डे'' मोहीम

CD

वांद्रे येथे ‘फिट सॅटर्डे’ मोहीम
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ ः मुंबईकरांच्या आरोग्यवर्धनासाठी मुंबई महापालिका प्रशासन ‘फिट सॅटर्डे’सारखे विविध उपक्रम सातत्याने राबवत असते. नागरिकांनी त्यात उत्स्फूर्त सहभागी होण्याचे आवाहन अतिरिक्त महापालिका आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी केले. वांद्रे येथील एमआयजी क्लब येथे आयोजित फिट सॅटर्डे उपक्रमात ते बोलत होते.
मुंबईकर नागरिकांचे आरोग्य सुदृढ आणि दैनंदिन जीवनशैली तंदुरुस्त राहावी, या उद्देशाने फिट इंडियाच्या धर्तीवर मुंबई महापालिकेतर्फे फिट सॅटर्डे ही मोहीम राबविण्यात येत आहे. या उपक्रमात सर्व वयोगटांतील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. योग, प्राणायाम, ध्यानधारणा यासह चालणे, धावणे, झुंबा यासारखे विविध व्यायाम प्रकार करण्यात आले. सहभागी नागरिकांनी नियमित व्यायाम व निरोगी जीवनशैलीचा संकल्प केला. या मोहिमेला गेल्या वर्षी वांद्रे किल्ला उद्यान येथून सुरुवात करण्यात आली होती. प्रत्येक शनिवारी सकाळी वांद्रे येथील किल्ला उद्यान परिसर आणि एमआयजी क्लब या ठिकाणी ही मोहीम पार पडते. पालिकेच्या सर्व २६ प्रशासकीय विभागांमध्ये ही मोहीम राबविण्याचे प्रस्तावित आहे.

व्यायामाची प्रेरणा
व्यायाम न करणाऱ्यांना नियमित व्यायाम करण्याची प्रेरणा मिळावी, न चालणाऱ्यांना चालायला लावणे, चालणाऱ्यांना जॉगिंगसाठी प्रोत्साहित करणे आणि जॉगिंग करणाऱ्यांना धावण्यासाठी प्रेरित करणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. फिट मुंबई या अभियानाचे घोषवाक्य ‘फिटनेस दिल से’ असे असून, प्रत्येक मुंबईकराच्या फिटनेस प्रवासाला नवी दिशा देत आहे. अधिकाधिक नागरिकांनी सहभागी होऊन या मोहिमेला पाठबळ द्यावे, असे आवाहन मुंबई महापालिका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. या उपक्रमात मुंबई उपनगरे जिल्हाधिकारी सौरभ कटियार, मुंबईचे अतिरिक्त पोलिस महासंचालक कृष्ण प्रकाश यांच्यासह पालिकेचे अधिकारी या उपक्रमात सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबई-गोवा महामार्गावर इंधन टँकरचा अपघात, १४ हजार लिटर ज्वलनशील साठा; रेस्क्यू ऑपरेशन सुरू

CTET फेब्रुवारी 2026 उत्तरपत्रिका लवकरच होणार जाहीर; जाणून घ्या डाउनलोड आणि इन्स्टॉलेशन प्रक्रियेबद्दल संपूर्ण माहिती

Latest Marathi News Live Update : मुंबई-गोवा महामार्गावर इंधन टँकरचा अपघात, पेट्रोल रस्त्यावर पडल्याने खळबळ

साप्ताहिक राशिभविष्य : (२२ फेब्रुवारी २०२६ ते २८ फेब्रुवारी २०२६)

Homi Bhabha Documentary Films Division : डॉ. होमी भाभा; विज्ञानाचा द्रष्टा शिल्पकार!

SCROLL FOR NEXT