मुंबई

शैक्षणीक साहित्य वाटप करत शिवजयंती साजरी

CD

बालरुपी महापुरुष अवतरले भायखळ्यात
शिवडी, ता. २१ (बातमीदार) ः छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भायखळ्यातील भीमनगर येथील तरुणांनी वेशभूषा स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत भीमनगरमधील चिमुकल्यांनी विविध महापुरुषांची रूपे साकारली होती. बाल कलाकारांनी साकारलेले ऐतिहासिक पात्र लोकांचे आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले. तसेच, तरुणांनी विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले. त्यांच्या या उपक्रमाचे परिसरात विशेष कौतुक होत आहे.
शिवजयंतीनिमित्त वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत महिलांसह चिमुकल्यांनी मोठा सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेमुळे यंदा बाल शिवाजी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, नेताजी सुभाषचंद्र बोस, राजमाता जिजाऊ, झाशीची राणी आदी महापुरुष बालरूपी भायखळ्यात अवतरल्याचा भास झाला. बाल कलाकारांनी साकारलेले ऐतिहासिक पात्र लोकांचे आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले. याप्रसंगी उपस्थितांच्या छत्रपती शिवाजी महाराज की जय, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. दरम्यान, विजेत्यांना पारितोषिक वाटप करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Weather: मुंबईला प्रदूषणाचा विळखा! हवेचा दर्जा खालावला; धोक्याची पातळी ओलांडल्याने आरोग्यतज्ज्ञांचं महत्त्वाचं भाकीत

Crime: लग्नाआधीच मेहंदी समारंभावेळी दोन्ही बहिणींनी जीवन संपवलं; एक तांत्रिक संबंध समोर; मृत्यूचं नेमकं गूढ काय?

बापरे! लिव्हर कॅन्सरनंतर दीपिकाच्या पोटात निघाली गाठ, अभिनेत्री व्हिडिओ शेअर करत म्हणाली...'आता मला खूप जास्त भीती...'

Sangli Miraj Crime : घरखर्चासाठी पोटच्या दोन मुलांची चाळीस हजारांत विक्री, मिरजेतील महिलेचे कृत्य; संशयित मनपाच्या रुग्णालयातील

India Brazil Trade: ब्राझीलकडून मिळणार खनिजे; संरक्षण क्षेत्रातील सहकार्यालाही आणखी बळ

SCROLL FOR NEXT