मुंबई

खोपोली भाजपा आक्रमक

CD

खालापूर शिक्षण प्रसारक मंडळावर वेतन घोटाळ्याचा आरोप
कारवाईसाठी खोपोली भाजप आक्रमक; जनआंदोलनाचा इशारा
खालापूर, ता. २१ (बातमीदार) ः खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळामध्ये कोट्यवधी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार आणि शिक्षक भरती प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप भाजपने केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यासाठी भाजपतर्फे प्रशासनाला पत्र देण्यात आले आहे.
शासनाच्या जुन्या मान्यतांचा आधार घेऊन काही शिक्षकांचे वेतन अनधिकृतरीत्या वाढवून घेण्यात आले आहे. याप्रकरणी आधीच पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून चौकशी सुरू आहे. दरम्यान, ही चौकशी निष्पक्ष व्हावी आणि चौकशी पूर्ण होईपर्यंत जबाबदार पदाधिकाऱ्यांना निलंबित करावे, अशी मागणी खोपोली शहर भाजपने केली आहे. तसेच शिक्षक वेतन प्रकरणातील आर्थिक नुकसानीची वसुली दोषींकडून करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळात २०२६-२०३१ या कालावधीसाठी झालेली निवड प्रक्रिया स्थगित करून नव्याने पारदर्शक प्रक्रिया राबविण्यात यावी. संस्थेच्या सर्व आर्थिक व्यवहारांचे विशेष लेखापरीक्षण प्रशासक नियुक्त करून करण्यात यावे, अशी मागणीदेखील भाजपाने केली आहे.

संस्थेतील दोन सदस्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता समितीतून वगळण्यात आले आहे. संबंधित सदस्यांनी नियमांनुसार ठेव रक्कम भरली आहे. अध्यक्षांची बिनविरोध निवड संशयास्पद व नियमबाह्य पद्धतीने करण्यात आल्याची तक्रार आहे. शिक्षण क्षेत्रातील संस्थेमध्ये अशा प्रकारचे गैरव्यवहार होणे ही अत्यंत गंभीर बाब असून, त्यामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांच्या भविष्यावर परिणाम होत आहे. दोषींवर कारवाई न झाल्यास तीव्र जन आंदोलन करण्यात येईल.
- अजय इंगुळकर, शहराध्यक्ष भाजपा

कोट्यवधींच्या घोटाळ्याचा आरोप चुकीचा आहे. वेतन गैरव्यवहाराशी संस्थेचा काही संबंध नाही. संस्थेकडून केवळ प्रस्ताव पाठवला जात असून, त्यावर शासनाकडून निर्णय होतो. संस्थेचा कारभार पूर्णपणे पारदर्शक आहे.
- संतोष जंगम, अध्यक्ष, खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT