मुंबई

गुलाब शेतीतून जिल्ह्याला नवी ओळख

CD

वाणगावच्या गुलाबाचा सुगंध महाराष्ट्रभर
७५ वर्षीय बबन चुरींनी जपल्या १३० जाती
सुनील कोकरे : सकाळ वृत्तसेवा
वाणगाव, ता. २१ : एकीकडे निसर्गाच्या लहरीपणामुळे वाणगावची सुप्रसिद्ध ‘लिली’ फुलशेती लोप पावत असताना, दुसरीकडे ७५ वर्षीय बबन चुरी यांनी आपल्या जिद्दीने गुलाब शेतीतून या भागाला नवी ओळख मिळवून दिली आहे. गेल्या ५० वर्षांपासून १३० वैविध्यपूर्ण गुलाब जातींचे संवर्धन करणाऱ्या चुरी यांना नुकतेच ‘राजाराणी’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून, पालघर जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

बावडा येथील बबन चुरी यांनी वयाच्या २५व्या वर्षी केवळ १८० कलमांपासून पाच गुंठ्यात ही शेती सुरू केली होती. आज त्याचे रूपांतर पाच एकर क्षेत्रात झाले आहे. सध्या त्यांच्याकडे पाच हजारपेक्षा अधिक झाडे असून, दरवर्षी २० हजार कलमांची ते निर्मिती करतात. बाजारात कलमाची किंमत ८०-९० रुपये असताना, केवळ ३० रुपयांत कलमे देऊन ते शेतकऱ्यांना प्रोत्साहन देत आहेत. या व्यवसायातून सर्व खर्च वजाजाता त्यांना वर्षाकाठी पाच लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळतो.

गुलाब शेतीचे महत्त्व जपताना चुरी यांनी गेल्या ५० वर्षांत रंगीबेरंगी १३० जातींचे संवर्धन केले आहे. सध्या पाच एकर क्षेत्रावर साधारणता पाच हजारपेक्षा अधिक झाडे, गुलाबाच्या कलमांची लागवड त्यांनी केली आहे. केवळ संवर्धन नव्हे तर ही फुलशेती त्यांच्या उत्पन्नाचा भक्कम स्रोत बनला आहे. आजच्या संघर्षमय आणि खडतर स्थितीत शेतकऱ्यांसमोर अनेक संकटे उभी आहेत. शेती आणि बागायतीसोबत नावीन्यपूर्ण फुलशेतीसारख्या क्षेत्राकडे वळल्यास कमी खर्चामधून चांगले उत्पन्न मिळते. अशा फुलशेतीकडे आर्थिक स्रोत म्हणून सर्वांनी पाहण्याची गरज चुरी यांनी अधोरेखित केली असून शेतकारीवर्गाला फुलशेती करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

डहाणू तालुक्यातील वाणगावजवळील बावडा या गावचे गुलाब फुलशेती फुलवणारे बबन चुरी यांनी वडिलोपार्जित जागेवर वयाच्या पंचविसाव्या वर्षी नातेवाईक यांच्या प्रेरणेमुळे मार्गदर्शनाने मेहुणे देवराव पाटील यांनी १८० गुलाब फुलझाडांची रोपे कलमे भेट देऊन लागवड केली. सुरुवातीला १८० कलमांपैकी ८० झाडे जगली. पाच गुंठ्याचे रूपांतर आज पाच एकर क्षेत्रात झाले असून आधुनिक पद्धतीने चुरी गुलाब कलमांची निर्मिती करतात. वर्षाकाठी पाच एकर गुलाब शेती लागवडीतून सरासरी खर्च वजा करता अंदाजे पाच लाख रुपये नफा मिळत असल्याची माहिती गुलाब फुलशेती उत्पादक शेतकरी बबन चुरी यांनी दिली आहे.

गुलाबाची व्यावसायिक उलाढाल
इंग्लिश गुलाब
दररोज ७०० ते ८०० फुलांचे उत्पादन होते. स्थानिक मार्केटमध्ये प्रति फूल तीन रुपयांनी विक्री केली जाते. विशेषतः लग्न समारंभ आणि व्हॅलेंटाइन डेला मोठी मागणी असते.

गावठी गुलाब
दररोज १० हजार फुलांची विक्री दादर मार्केटमध्ये केली जाते. उर्वरित फुलांपासून घरीच सरबत आणि गुलकंद यांसारखी उत्पादने तयार केली जातात.

जिल्ह्यातील फुलशेतीला नवी दिशा
पालघर जिल्ह्यात सध्या ५०० हेक्टरवर फुलशेती केली जात आहे. यामध्ये ऑर्किड, सोनचाफा आणि झेंडूच्या उत्पादनाकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. मुंबईच्या दादर मार्केटशी असलेल्या थेट संपर्कामुळे फुलशेती हा शेतकऱ्यांसाठी शाश्वत उत्पन्नाचा स्रोत ठरत आहे. जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर कमी खर्चात चांगली कमाई शक्य आहे, असा संदेश चुरी यांनी तरुणाईला दिला आहे.

गुलाब शेतीची वैशिष्ट्ये
जातींचे संवर्धन : ५० वर्षांत १३० रंगीबेरंगी जाती जपल्या.
कमी दरात विक्री : ८० रुपयांचे कलम केवळ ३० रुपयांत उपलब्ध
शाश्वत उत्पादन : एकदा लागवड केल्यावर पाच वर्षे उत्पादन मिळते.
जोडधंदा : गावठी गुलाबापासून सरबत आणि गुलकंद निर्मिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Weather: मुंबईला प्रदूषणाचा विळखा! हवेचा दर्जा खालावला; धोक्याची पातळी ओलांडल्याने आरोग्यतज्ज्ञांचं महत्त्वाचं भाकीत

Crime: लग्नाआधीच मेहंदी समारंभावेळी दोन्ही बहिणींनी जीवन संपवलं; एक तांत्रिक संबंध समोर; मृत्यूचं नेमकं गूढ काय?

बापरे! लिव्हर कॅन्सरनंतर दीपिकाच्या पोटात निघाली गाठ, अभिनेत्री व्हिडिओ शेअर करत म्हणाली...'आता मला खूप जास्त भीती...'

Sangli Miraj Crime : घरखर्चासाठी पोटच्या दोन मुलांची चाळीस हजारांत विक्री, मिरजेतील महिलेचे कृत्य; संशयित मनपाच्या रुग्णालयातील

India Brazil Trade: ब्राझीलकडून मिळणार खनिजे; संरक्षण क्षेत्रातील सहकार्यालाही आणखी बळ

SCROLL FOR NEXT