मुंबई

रमजान महिन्यात तात्पुरत्या स्टॉलसाठी परवानगी

CD

भिवंडीत रमजानसाठी तात्पुरत्या स्टॉलला परवानगी
स्वच्छतेसह कडक अटींचे पालन बंधनकारक

भिवंडी, ता. २१ (बातमीदार) : मुस्लिमबहुल भिवंडी निजामपूर शहर महापालिका कार्यक्षेत्रात १९ फेब्रुवारी ते २१ मार्च या कालावधीत साजऱ्या होणाऱ्या पवित्र रमजान महिन्यासाठी महापालिका प्रशासनाने कडक अटींनुसार तात्पुरते स्टॉल लावण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. या स्टॉलमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये आणि स्वच्छतेचे नियम पाळले जावेत, यासाठी महापालिकेने प्रत्येक प्रभागात फिरते पथक नियुक्त करावे, अशी मागणी आता नागरिकांकडून जोर धरत आहे.

रमजानच्या काळात खाद्यपदार्थांचे आणि इतर वस्तूंचे स्टॉल मोठ्या संख्येने लागतात. या पार्श्वभूमीवर महापालिकेने स्टॉलधारकांसाठी महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहेत. सायंकाळी इफ्तारनंतर निर्माण होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी स्टॉलधारकाची असेल. प्रत्येक स्टॉलवर कचराकुंडी ठेवणे बंधनकारक असून, दिवसातून दोनदा परिसराची स्वच्छता करणे आवश्यक आहे. स्टॉलमध्ये पुरेशी आग प्रतिबंधक उपकरणे ठेवणे अनिवार्य आहे. स्टॉलवर प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर टाळण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांना दिसेल अशा ठिकाणी धूम्रपान निषेध मजकुराची पाटी लावणे बंधनकारक असून, नियमांचे उल्लंघन झाल्यास परवाना तत्काळ रद्द केला जाईल.

वाहतूक कोंडीचे आव्हान
शहरातील मुख्य मार्गांवर स्टॉलमुळे रहदारीस अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी महापालिकेने वाहतूक विभागाला विशेष दक्षता घेण्यास कळविले आहे. खाण्यापिण्याचे स्टॉल सायंकाळी सुरू होत असले तरी खरेदीसाठी दिवसभर आणि रात्रीही गर्दी असते. अशा वेळी पालिकेच्या अटींचे पालन होतेय की नाही, हे तपासण्यासाठी प्रशासनाने अद्याप फिरते पथक नेमलेले नाही. त्यामुळे प्रत्येक प्रभाग समितीअंतर्गत स्वतंत्र पथके नेमावीत, जेणेकरून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, अशी मागणी भिवंडीकरांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar CM: बिहारचा नवा मुख्यमंत्री ठरला! 'या' नावावर शिक्कामोर्तब, अधिकृत घोषणा संध्याकाळी

Ayushman Bharat Scheme Update: आयुष्मान भारत योजनेत मोठा बदल! मोदी सरकारमुळे मिळणार ₹10 लाखांपर्यंत मोफत उपचार

IPL 2026: 'भारतात यशस्वी ठरलेल्या लोकांकडून शिकतोय अन् नोट्स घेतोय...' पंजाबच्या मॅचविनरने उघड केलं यशाचं गुपित

Maoist Song Dance Pune: पुण्यातील वसतिगृहात माओवादी आशय असलेल्या गाण्यावर नृत्य; Video Viral

SBI Whatsapp : स्टेट बँकेत अकाऊंट आहे? तुमच्यासाठी मोठी खुशखबर; घरबसल्या व्हॉट्सॲपवर होणार सगळं काम, पाहा काय आहे नवी सुविधा

SCROLL FOR NEXT