मुंबई

सानपाडा परिसरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई

CD

जुईनगर, ता. २१ (बातमीदार) : सिडकोच्या अनधिकृत बांधकामे विभागामार्फत सानपाडा नोड परिसरात शुक्रवारी (ता. २०) तोडक मोहीम राबविण्यात आली. या कारवाईदरम्यान सिडकोच्या अधिसूचित व संपादित जागेवरील सेक्टर पाचमधील भूखंड क्रमांक २१४ व २१४अ शेजारी, तसेच मौजे सानपाडा येथील सर्व्हे क्रमांक ५४/३, ५४/८ आणि ७६/६ मधील अंदाजे ८० चौ.मी. क्षेत्रफळावरील अनधिकृत बांधकामे हटविण्यात आली. ही बांधकामे सिडकोच्या नियमावली व धोरणांचे उल्लंघन करून, तसेच सिडको महामंडळ अथवा संबंधित प्राधिकरणाची कोणतीही अधिकृत परवानगी न घेता उभारण्यात आली होती. नियमबाह्य व बेकायदा स्वरूपामुळे ही बांधकामे निष्कासित करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या कारवाईसाठी जेसीबी, तीन जीप आणि पाच कामगारांचा वापर करण्यात आला. मोहीम मुख्य दक्षता अधिकारी यांच्या निर्देशानुसार, तसेच मुख्य नियंत्रक, अनधिकृत बांधकामे (नवी मुंबई) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Weather: मुंबईला प्रदूषणाचा विळखा! हवेचा दर्जा खालावला; धोक्याची पातळी ओलांडल्याने आरोग्यतज्ज्ञांचं महत्त्वाचं भाकीत

Crime: लग्नाआधीच मेहंदी समारंभावेळी दोन्ही बहिणींनी जीवन संपवलं; एक तांत्रिक संबंध समोर; मृत्यूचं नेमकं गूढ काय?

बापरे! लिव्हर कॅन्सरनंतर दीपिकाच्या पोटात निघाली गाठ, अभिनेत्री व्हिडिओ शेअर करत म्हणाली...'आता मला खूप जास्त भीती...'

Sangli Miraj Crime : घरखर्चासाठी पोटच्या दोन मुलांची चाळीस हजारांत विक्री, मिरजेतील महिलेचे कृत्य; संशयित मनपाच्या रुग्णालयातील

India Brazil Trade: ब्राझीलकडून मिळणार खनिजे; संरक्षण क्षेत्रातील सहकार्यालाही आणखी बळ

SCROLL FOR NEXT