मुंबई

रस्ते कामांमुळे धुळीचे साम्राज्य

CD

रस्ते कामांमुळे धुळीचे साम्राज्य
श्वसनाचे आजार वाढले; पाण्याच्या फवारणीची मागणी
अलिबाग, ता. २१ (वार्ताहर) : एमएसआयडीसीकडून सुरू असलेल्या अलिबाग-रोहा आणि अलिबाग-मुरूड रस्त्यांच्या रुंदीकरणामुळे परिसरात प्रचंड धूळ उडत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. खोदकाम करून सिमेंट, खडी व मुरूम टाकलेल्या रस्त्यावरून वाहनांची सतत ये-जा होत असल्याने धुरळा उडतो. अनेक ठिकाणी वाहन दिसेनासे होईल इतकी धूळ पसरत असून अपघाताचा धोका वाढला आहे.
गेल्या चार-पाच महिन्यांपासून सुरू असलेल्या या कामादरम्यान कच्च्या रस्त्यावर नियमित पाण्याची फवारणी होत नसल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत. दुचाकीस्वारांना प्रवास करताना श्वास घेणे कठीण होत असून कपड्यांवर धुळीचा थर साचत आहे. दिवसभर उन्हात तापलेल्या खडीमुळे धुरळा अधिक वाढत असल्याची तक्रार आहे. त्यामुळे ठेकेदाराने दिवसातून किमान दोन ते तीन वेळा पाणी मारावे, अशी मागणी होत आहे.

धुळीमुळे श्वसनाचे आजार वाढले
रस्त्यावरून उडणारी सूक्ष्म धूळ श्वासावाटे शरीरात जाऊन फुप्फुसात साचत आहे. त्यामुळे सर्दी, खोकला, कफ, धाप लागणे, घशात खवखव, डोळ्यांची जळजळ आणि सतत शिंका येणे, असे त्रास वाढले आहेत. ॲलर्जी असणाऱ्या नागरिकांना विशेषतः अधिक त्रास होत असून आरोग्य विभागानेही याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबई-गोवा महामार्गावर इंधन टँकरचा अपघात, १४ हजार लिटर ज्वलनशील साठा; रेस्क्यू ऑपरेशन सुरू

CTET फेब्रुवारी 2026 उत्तरपत्रिका लवकरच होणार जाहीर; जाणून घ्या डाउनलोड आणि इन्स्टॉलेशन प्रक्रियेबद्दल संपूर्ण माहिती

Latest Marathi News Live Update : मुंबई-गोवा महामार्गावर इंधन टँकरचा अपघात, पेट्रोल रस्त्यावर पडल्याने खळबळ

साप्ताहिक राशिभविष्य : (२२ फेब्रुवारी २०२६ ते २८ फेब्रुवारी २०२६)

Homi Bhabha Documentary Films Division : डॉ. होमी भाभा; विज्ञानाचा द्रष्टा शिल्पकार!

SCROLL FOR NEXT