छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिराचा लाभ घ्या : तहसीलदारांचे आवाहन
मार्च ते मेदरम्यान तालुक्यात टप्प्याटप्प्याने शिबिरे; महसूल प्रश्नांवर तत्काळ तोडगा
मुरुड, ता. २१ (बातमीदार) : सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला व विद्यार्थ्यांच्या महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन प्रश्नांचे तत्काळ निराकरण करण्यासाठी शासनाच्या निर्णयानुसार तालुक्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान’ टप्पा क्र. १ राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत मंडळ व नगर परिषद/नगर पंचायत स्तरावर एकदिवसीय शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन तहसीलदार आदेश डफळ यांनी केले आहे.
महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख व गतिमान करण्याच्या उद्देशाने हे शिबिर मार्च ते मे या कालावधीत होणार आहे. १८ फेब्रुवारी ते ५ मार्चदरम्यान पूर्वतयारी होणार असून, ७ आणि १४ मार्च तसेच १० आणि १७ एप्रिलला मंडळ स्तरावर शिबिरे भरतील. तर ८ आणि १५ मे रोजी नगर परिषद व नगर पंचायत स्तरावर शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे.
या शिबिरात प्रलंबित फेरफार निकाली काढणे, अभिलेख दुरुस्ती, लोकसेवा हक्क कायद्यानुसार तत्काळ सेवा, अकृषिक प्रकरणांबाबत मार्गदर्शन, भूसंपादन प्रकरणांची नोंद अद्ययावत करणे तसेच ‘इज ऑफ डुइंग बिझनेस’अंतर्गत नागरी सुविधांबाबत माहिती दिली जाणार आहे.
समाधान शिबिरांतर्गत ‘सिंगल डे सर्व्हिस डिलिव्हरी’द्वारे नागरिकांना अनेक महसूल सेवा एकाच ठिकाणी व तत्काळ उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्यामुळे प्रलंबित कामांचा जलद निपटारा होऊन शेतकरी व सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.