मुंबई

ठाण्यात रिक्षाचालकावर काचेच्या बाटलीने हल्ला

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २१ : घोडबंदर रोडवरील आनंदनगर परिसरात प्रवासी भरण्याच्या वादातून रिक्षाचालकावर काचेच्या दारूच्या बाटलीने हल्ला झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी कासारवडवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
सूरज सरगर (वय २१) असे जखमी रिक्षाचालकाचे नाव आहे. ते आनंदनगर ते ठाणे स्थानकदरम्यान शेअरिंग रिक्षा चालवून उदरनिर्वाह करतात. पोलिसांच्या माहितीनुसार, १८ फेब्रुवारीला सायंकाळी सुमारे ८.३० वाजण्याच्या सुमारास सुरज हे आनंदनगर नाका येथे नेहमीप्रमाणे रिक्षामध्ये प्रवासी भरत उभे होते. त्यावेळी त्यांच्या ओळखीचा सागर पवार तेथे आला. मागील वादातून राग मनात धरून त्याने रिक्षामध्ये प्रवासी भरण्यास मनाई करत शिवीगाळ सुरू केली. सूरज यांनी विरोध केला असता सागरने धक्काबुक्की केली. त्यानंतर काचेची बाटली उचलून त्यांच्या डोक्यात मारल्याचे तक्रारीत नमूद आहे. या हल्ल्यात सूरज जखमी झाले. याप्रकरणी सागरविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Womens Reservation Bill: मुस्लिम महिलांच्या मुद्द्यावरुन अमित शाह संतापले; अखिलेश यादव यांना जोरदार प्रत्युत्तर

Latest Marathi News Live Update : महापालिकेच्या राजावाडी रुग्णालयातील निवासी डॉक्टर उद्यापासून संप पुकारणार

Pat Cummins:तो येतोय... काव्या मारनच्या गालावरील खळी आणखीन फुलणार; SRH च्या ताफ्यात भारी खेळाडू दाखल

Summer Mobile Cooling Tips : उन्हाळ्यात तुमचा फोनही 'भट्टी'सारखा तापतोय? मग 'ही' १ छोटी सेटिंग करा आणि फोन ठेवा बर्फासारखा कूल!

Vaibhav Sooryavanshi चे भारतीय संघात पदार्पण म्हणजे, संजू सॅमसन-सूर्यकुमार यादव यांच्यासाठी Bad News? रिपोर्टने उडवलीय झोप

SCROLL FOR NEXT