मुंबई

कल्याण-डोंबिवलीत ६३.९५ लाखांची आर्थिक फसवणूक

CD

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २१ : कल्याण-डोंबिवली शहर आणि ग्रामीण भागात घडलेल्या दोन स्वतंत्र घटनांमध्ये गुंतवणूक व कंपनी स्थापन करून देण्याचे प्रलोभन दाखवत तिघा भामट्यांनी दोघांकडून मिळून ६३ लाख ९५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले असून तपास सुरू आहे.
पहिल्या प्रकरणात कल्याण येथील रहिवासी विजय झाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मनीष कुमार मिश्रा आणि सिद्धेश या दोघांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. आरोपींनी झाडे यांच्या मुलाशी मोबाईलद्वारे संपर्क साधून शेअर बाजारातील गुंतवणुकीत मोठा नफा मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवले. बनावट गुंतवणूक योजनेच्या नावाखाली डी-मॅट खाते जोडण्यास भाग पाडत त्यांनी टप्प्याटप्प्याने ४४ लाख ४५ हजार रुपये ऑनलाइन उकळले. एका वर्षात एक कोटी १५ लाख रुपयांचा परतावा देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, ना नफा मिळाला ना मूळ रक्कम परत मिळाली. मे २०२५ ते फेब्रुवारी २०२६ या कालावधीत हा प्रकार घडल्याचे तक्रारीत नमूद आहे.
दुसऱ्या घटनेत डोंबिवलीजवळील लोढा-पलावा परिसरातील रहिवासी भावना देवकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, पुणे येथील सलील श्रीपाद मेहेंदळे यांनी कंपनी स्थापन करून देण्याचे प्रलोभन दाखवून १९ लाख ५० हजार रुपये उकळले. आरोपीने वेळोवेळी स्वतःच्या बँक खात्यावर; तसेच कॅनडा येथील एका कंपनीच्या नावाने रक्कम वर्ग करण्यास सांगितले. मात्र, कंपनी स्थापन केली नाही, रक्कमही परत केली नसल्याचे फिर्यादीत नमूद आहे. २०२३ ते फेब्रुवारी २०२६ या कालावधीत हा प्रकार घडला आहे. या दोन्ही घटनांप्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल केले असून पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat: अशोक खरातच्या अत्यंत जवळच्या माणसाचा अपघाती मृत्यू; शिर्डी जमीन घोटाळ्यात होते साक्षीदार

Fake Alphonso Mango in Nipani : हापूसच्या पेटीत कर्नाटकी आंबा! बाजारात ग्राहकांची मोठी फसवणूक; 700 ते 800 रुपये दराने मिळतोय आंबा

Latest Marathi News Live Update: अशोक खरातच्या ओकस कार्यालयात ईडीकडून गेल्या तीन तासांपासून झडती सुरू

Pune Sugar Protest: शेतकऱ्यांचा एल्गार!घामाच्या पैशासाठी 'आरपार'ची लढाई; ३० एप्रिलपासून पुण्यातील साखर संकुलाला बेमुदत वेढा..

Success Story: ग्रामीण भागातून न्यायालयापर्यंतचा प्रवास; कल्पेश कड न्यायाधीशपदी विराजमान, जिद्द आणि मेहनतीचा विजय!

SCROLL FOR NEXT