मुंबई

होळीनिमित्त ''मरे''वर २४ अतिरिक्त विशेष गाड्या

CD

होळीनिमित्त २४ अतिरिक्त विशेष गाड्या
मध्ये रेल्वेच्या एलटीटी-कानपूर; पुणे/हडपसर-झांसी मार्गावर धावणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ : होळीनिमित्त गावी जाणाऱ्या प्रवाशांची वाढलेली गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने आणखी २४ विशेष लांब पल्ल्याच्या गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्या एलटीटी-कानपूर, तसेच पुणे आणि हडपसर-झांसी मार्गांदरम्यान धावणार आहेत. मध्य रेल्वेने यापूर्वी २१६ होळी विशेष गाड्यांची (१८६ होळी विशेष आणि ३० अतिरिक्त विशेष) घोषणा केली होती. नव्याने जाहीर केलेल्या २४ गाड्यांमुळे होळी विशेष गाड्यांची एकूण संख्या आता २४० वर पोहोचली आहे.

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, एलटीटी- कानपूर- एलटीटी साप्ताहिक सुपरफास्ट विशेष गाडीच्या आठ सेवा चालविण्यात येणार आहेत. ट्रेन क्रमांक ०४१५२ ही विशेष गाडी ७ ते २८ मार्चदरम्यान दर शनिवारी सायंकाळी ५.१५ वाजता एलटीटी येथून सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी ३.४५ वाजता कानपूर सेंट्रल येथे पोहोचेल. तर ट्रेन क्रमांक ०४१५१ ही विशेष गाडी ६ ते २७ मार्चदरम्यान दर शुक्रवारी दुपारी १ वाजता कानपूर सेंट्रल येथून सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी २.५५ वाजता एलटीटी येथे पोहोचेल. या गाड्यांना भुसावळ, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, धाभौरा, प्रयागराज, भारवारी, सिरथू आणि फतेहपूर येथे थांबे असतील.

तसेच पुणे- झांसी- पुणे साप्ताहिक सुपरफास्ट विशेष गाडीच्या आठ सेवा चालविण्यात येणार आहेत. ट्रेन क्रमांक ०१९२१ ही गाडी ५ ते २६ मार्चदरम्यान दर गुरुवारी दुपारी ३.१५ वाजता पुणे येथून सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता वीरांगना लक्ष्मीबाई झांसी येथे पोहोचेल. तर ट्रेन क्रमांक ०१९२२ ही गाडी ४ ते २५ मार्चदरम्यान दर बुधवारी दुपारी १२.५० वाजता झांसी येथून सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ११.३५ वाजता पुणे येथे पोहोचेल. या गाड्यांना दौंड कॉर्ड लाइन, अहिल्यानगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खांडवा, इटारसी, नर्मदापुरम, राणी कमलापती, विदिशा, बिना आणि ललितपूर येथे थांबे असतील.

याशिवाय हडपसर- झांसी- हडपसर साप्ताहिक सुपरफास्ट विशेष गाडीच्या आठ सेवा चालविण्यात येणार आहेत. ट्रेन क्रमांक ०१९२३ ही गाडी ८ ते २९ मार्चदरम्यान दर रविवारी सायंकाळी ७.१० वाजता हडपसर येथून सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी ३ वाजता झांसी येथे पोहोचेल. तर ट्रेन क्रमांक ०१९२४ ही गाडी ७ ते २८ मार्चदरम्यान दर शनिवारी सायंकाळी ७.४० वाजता झांसी येथून सुटून दुसऱ्या दिवशी सायंकाळी ४.३० वाजता हडपसर येथे पोहोचेल. या गाड्यांना दौंड कॉर्ड लाइन, अहिल्यानगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, इटारसी, राणी कमलापती आणि बिना येथे थांबे असतील.

या २४ अतिरिक्त होळी विशेष गाड्यांचे आरक्षण २३ फेब्रुवारीपासून भारतीय रेल्वेच्या सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर तसेच आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर सुरू होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

खरातशी संबंधित मालमत्ता बड्या अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांच्या नावे, ईडीचा ससेमिरा मागे लागणार; सरकारी बाबूंचे धाबे दणाणले

US-Iran War: ''रात्रीतून सगळं संपेल...'' इराणसोबतच्या बैठकीवरुन अमेरिकेचं मोठं विधान

Chhatrapati Sambhajinagar: भामट्यांनी दोन दिवसांत हिसकावले तिघींचे मंगळसूत्र; सांगा, रात्री घराबाहेर जाणे टाळावे का?

Chhatrapati Sambhajinagar: उभ्या ट्रकला आयशर धडकला; वडोद बाजार फाट्यावरील घटना; चालक गंभीर जखमी

महाराष्ट्राला उष्णतेच्या लाटेचा इशारा, अकोला जगात सर्वात उष्ण शहर, टॉप १५ मध्ये राज्यातली पाच शहरं

SCROLL FOR NEXT