मुंबई

खारघरमध्ये अतिक्रमणाचा विळखा

CD

मार्जिनल स्पेस गिळंकृत; खारघरमध्ये अतिक्रमणाचा विळखा
पादचारी रस्ते, बसथांब्यासमोर पार्किंग; कारवाईवर प्रश्नचिन्ह
खारघर, ता. २१ (बातमीदार) : नियोजनबद्ध शहर म्हणून ओळख असलेल्या खारघरमध्ये रस्त्यालगतच्या मार्जिनल स्पेसवर व्यापाऱ्यांनी केलेल्या अतिक्रमणामुळे पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालण्याची वेळ आली आहे. सेक्टर ७ ते शिवमंदिर, नवरंग सर्कल-शिल्प चौक, सेक्टर १३ मॅक्स शोरूम ते सेक्टर २१ तसेच जलवायू-शिल्प चौक या मुख्य मार्गांवर फलक, शेड, अतिरिक्त काउंटर, मालाचे रॅक आणि अनधिकृत स्टॉल उभारून सार्वजनिक जागेचा व्यापारी वापर सुरू असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे.
मार्जिनल स्पेस ही आपत्कालीन सेवा, पादचारी हालचाल व सुरक्षित अंतरासाठी राखीव असतानाही तिचा सर्रास व्यावसायिक वापर होत आहे. काही ठिकाणी संपूर्ण पादचारी मार्गच बंद झाल्याने नागरिकांना वाहतुकीच्या रस्त्यावरून मार्ग काढावा लागत असून, अपघाताचा धोका वाढला आहे. सायंकाळच्या गर्दीच्या वेळी परिस्थिती अधिकच बिकट होते.
पालिकेकडून नियमित कारवाई होत असल्याचा दावा प्रभाग अधिकारी रुपाली माने यांनी केला असला, तरी कारवाई केवळ देखाव्यापुरतीच असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
चौकट
शिल्प चौकात अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी
शिल्प चौकाजवळील एका दुकानाने मार्जिनल स्पेसवर शेड टाकून विक्री सुरू केल्याने ग्राहकांची वाहने थेट रस्त्यावर उभी राहतात. त्याच ठिकाणी बसथांबा असल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो. बसथांब्यापुढे उभी राहणारी वाहने आणि रस्त्यावर वाढलेली गर्दी यामुळे वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे.
चौकट
नियोजनबाह्य वापरामुळे शहरी शिस्त धोक्यात
मार्जिनल स्पेसचा व्यापारी वापर वाढल्याने शहर नियोजनाच्या मूलभूत संकल्पनेलाच तडा गेला आहे. आपत्कालीन वाहनांना मोकळा मार्ग मिळणे, पादचाऱ्यांची सुरक्षित हालचाल आणि पार्किंगचे नियोजन या सर्व बाबी धोक्यात आल्या आहेत. तातडीने सर्वेक्षण करून अतिक्रमण हटवण्याबरोबरच पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी सातत्यपूर्ण मोहीम राबवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

कोट :
पालिकेकडून खारघर परिसरात मार्जिनल स्पेसवर सामान ठेवून विक्री करणाऱ्या दुकानदारांवर नियमितपणे कारवाई केली जात आहे.
- रुपाली माने, प्रभाग अधिकारी, खारघर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Weather: मुंबईला प्रदूषणाचा विळखा! हवेचा दर्जा खालावला; धोक्याची पातळी ओलांडल्याने आरोग्यतज्ज्ञांचं महत्त्वाचं भाकीत

Crime: लग्नाआधीच मेहंदी समारंभावेळी दोन्ही बहिणींनी जीवन संपवलं; एक तांत्रिक संबंध समोर; मृत्यूचं नेमकं गूढ काय?

बापरे! लिव्हर कॅन्सरनंतर दीपिकाच्या पोटात निघाली गाठ, अभिनेत्री व्हिडिओ शेअर करत म्हणाली...'आता मला खूप जास्त भीती...'

Sangli Miraj Crime : घरखर्चासाठी पोटच्या दोन मुलांची चाळीस हजारांत विक्री, मिरजेतील महिलेचे कृत्य; संशयित मनपाच्या रुग्णालयातील

India Brazil Trade: ब्राझीलकडून मिळणार खनिजे; संरक्षण क्षेत्रातील सहकार्यालाही आणखी बळ

SCROLL FOR NEXT