शिव जयंती निमित्त रक्तदान शिबीर
खारघर, ता. २१ (बातमीदार) : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिव आधार सामाजिक सेवा संस्था व साई ब्लड बँक पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. तसेच संजीवनी हॉस्पिटल व पॅथॉलॉजी लॅबच्या माध्यमातून मोफत आरोग्य व रक्ततपासणी शिबिरात शुगर, कोलेस्ट्रॉल व किडनी चाचण्या करण्यात आल्या. डॉ. तुषार सोनटक्के यांनी रुग्णांची तपासणी केली. संघर्ष संस्थेतर्फे दारूमुक्त खारघर अभियानातील डॉ. वैभव भदाणे, डॉ. नरेंद्र कदम, कीर्ती मेहरा, महेश नारकर व तुकाराम कंठाले यांचा सत्कार करण्यात आला. बिग बॉस हिंदीमधील उपविजेता प्रणित मोरे यांचाही गौरव करण्यात आला. शांतिदूत मर्दानी आखाड्याच्या विद्यार्थ्यांनी लाठी-काठी व दांडपट्टा सादरीकरण केले. कार्यक्रमाला बाळासाहेब पाटील, परेश ठाकूर, समीर कदम, अॅड. नरेश ठाकूर, सोनल नवघरे व उषा अडसूळ उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.