माझी वसुंधरामध्ये खालापूरचा डंका
आठ ग्रामपंचायतींना साडेपाच कोटींचे पुरस्कार
खालापूर, ता. २० (बातमीदार): ‘माझी वसुंधरा अभियान ५.०’मध्ये खालापूर तालुक्याने ऐतिहासिक कामगिरी बजावली आहे. तालुक्यातील आठ ग्रामपंचायतींनी मिळून एकूण साडेपाच कोटी रुपयांचे पुरस्कार पटकावले आहेत.
शासनाच्या माझी वसुंधरा उपक्रमसाठी खालापूर तालुक्यातील सर्व ४५ ग्रामपंचायती क्षेत्रभेट पाहणी दौऱ्यासाठी पात्र ठरल्या होत्या. ४५ पैकी आठ ग्रामपंचायत यांना नऊ पुरस्कार मिळाले. तालुक्यातील शिरवली ग्रामपंचायतीने दोन महत्त्वाचे पुरस्कार मिळवत दीड कोटी रुपयांवर आपले नाव कोरले आहे. शिरवलीने राज्यात प्रथम क्रमांक पटकावत १ कोटी रुपये आणि भूमी थीममध्ये प्रथम येत ५० लाख रुपयांचा अतिरिक्त पुरस्कार मिळवला आहे. वडगाव ग्रामपंचायतीने कोकण विभागात प्रथम रक्कम मिळवत एक कोटीचा पुरस्कार मिळवला. चौक, तांबटी, नारंगी, वडवळ, वासांबे, तुपगाव या ग्रामपंचायतीने कोकण विभागात राज्यात चांगली कामगिरी करत पन्नास लाख रकमेचे पुरस्कार प्राप्त केले. विशेष म्हणजे खालापूर पंचायत समितीचे वरिष्ठ गटविकास अधिकारी संदीप कराड यांची विभाग स्तरावर सर्वोत्तम गटविकास अधिकारी म्हणून निवड करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.