मुंबई

ठाण्यातील बांधकाम व्यावसायिकाकडे ‘बिश्नोई ग्रुप’च्या नावाने मागितली दहा कोटींची खंडणी ;

CD

बांधकाम व्यावसायिकाकडे खंडणीची मागणी
‘बिश्नोई ग्रुप’च्या नावे जीवे मारण्याची धमकी

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २१ : महाशिवरात्रीनिमित्त मध्य प्रदेशात पूजेसाठी गेलेल्या ठाण्यातील एका ज्येष्ठ बांधकाम व्यावसायिकाला व्हॉट्सअ‍ॅप कॉलद्वारे ‘बिश्नोई ग्रुप’च्या नावाने १० कोटींची खंडणी मागत जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तसेच पोलिसांकडे तक्रार केली तर ‘एन्काउंटर’ करण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी नौपाडा पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तिविरोधात आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बांधकाम व्यावसायिक यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाशिवरात्रीच्या पूजेसाठी कुटुंबासह मध्य प्रदेश येथे गेले असताना बुधवारी (ता. ११) दुपारच्या सुमारास त्यांच्या दूरध्वनी क्रमांकावर आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून व्हॉट्सअ‍ॅप कॉल आला; मात्र पूजा कार्यक्रमात व्यस्त असल्याने त्यांनी कॉल स्वीकारला नाही. त्यानंतर पुन्हा सायंकाळी ७ वाजता संबंधित क्रमांकावरून फोन आला. त्या वेळी अनोळखी व्यक्तीने स्वतःला ‘बिश्नोई ग्रुप’मधून बोलत असल्याचे सांगत, ‘दहा कोटी रुपये पाठवा, अन्यथा ठार मारू,’ अशी धमकी दिली. तसेच पोलिसांकडे तक्रार केली तर ‘एन्काउंटर’ करण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्या व्यक्तीने स्वतःचे नाव सांगण्यास नकार दिल्यानंतर तक्रारदारांनी फोन कट केला. तसेच शुक्रवारी (ता. २०) तक्रारदार पाचपाखाडी परिसरातील कार्यालयात असताना आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून पुन्हा व्हॉट्सअ‍ॅप कॉल आले. संशय आल्याने त्यांनी फोन स्वीकारला नाही. त्यानंतर संबंधित क्रमांकावरून व्हॉट्सअ‍ॅपवर धमकीचा व्हॉईस मेसेज पाठविण्यात आला. याप्रकरणी तक्रारदार यांनी नौपाडा पोलिस ठाण्यात धाव घेत, दिलेल्या तक्रारीनुसार त्या अनोळखी व्यक्तिविरोधात खंडणी व धमकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर आंतरराष्ट्रीय क्रमांकांचा तपास सुरू केला असून सायबर सेलची मदत घेतली जात आहे. याप्रकरणी पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Solapur flight: पुण्याहून सोलापूर आता ४० मिनिटांत पोहोचणे शक्य होणार; १ मेपासून स्टार एअरची विमानसेवा, नवीन स्लॉट मंजूर!

आवडत्या क्रिकेटपटूविरोधात डॉ. आंबेडकरांनी लढवली होती निवडणूक, हा प्रसंग एकदा वाचाच...

Kolhapur Danoli Crime : कोल्हापुरातील दानोळीमध्ये अपहरण करून खून, २५ लाखांची मागणी, भरतेशचा कारण नसताना बळी, घटनास्थळी आमदार यड्रावकर दाखल

Bihar CM: बिहारचा नवा मुख्यमंत्री ठरला! 'या' नावावर शिक्कामोर्तब, अधिकृत घोषणा संध्याकाळी

Ayushman Bharat Scheme Update: आयुष्मान भारत योजनेत मोठा बदल! मोदी सरकारमुळे मिळणार ₹10 लाखांपर्यंत मोफत उपचार

SCROLL FOR NEXT