राहुल क्षीरसागर : सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २१ : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना पुरविण्यात येणाऱ्या सुविधांसाठी आकारण्यात येणाऱ्या थकीतसह चालू वर्षाच्या करवसुलीवर ठाणे जिल्हा परिषद प्रशासनाने भर दिला आहे. त्यानुसार घरपट्टी, पाणीपट्टी, दिवाबत्ती व आरोग्य करवसुलीसाठी मोहीम राबवली आहे. त्यानुसार यंदा जानेवारीपर्यंत १०१ कोटी २२ लाख ६३ हजारांची वसुली झाल्याची माहिती प्रशासनाने दिली.
ठाणे जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील ग्रामीण भागातील घरपट्टी व पाणीपट्टी थकबाकीदारांपाठोपाठ दिवाबत्ती व आरोग्यकर वसुली करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजीत यादव यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यवाही करण्यात येत आहे. त्यानुसार ग्रामपंचायत स्तरावरून थकबाकीदारांना नोटिसा बजाविण्यात आल्या होत्या. या नोटिशीला प्रतिसाद दिल्याने जिल्ह्याची दिवाबत्ती कर व आरोग्यकर वसुलीतून महसुलात वाढ झाल्याचे प्रशासनाने सांगितले.
ठाणे जिल्हा परिषदेच्या अंतर्गत ४१३ ग्रामपंचायती असून, या ग्रामपंचायतींना दिवाबत्ती करवसुलीचे थकबाकीसह आठ कोटी ७९ लाख ३८ हजार २७७ रुपयांचे उद्दिष्टे देण्यात आले होते. त्यापैकी पाच कोटी ३२ लाख १ हजार ३२० रुपयांची वसूल झाले. आरोग्य करवसुलीचे थकबाकीसह चालू वर्षाचे तीन कोटी दोन लाख ८४ हजार ६८० रुपयांचे उद्दिष्टे असून त्यापैकी दोन कोटी आठ लाख तीन हजार ४२८ रुपयांची वसुली झाली आहे.
२०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी घरपट्टी वसुलीचे १४३ कोटी ८१ लाख ५६ हजार ७८९ चे उद्दिष्टे ग्रामपंचायत विभागाला दिले होते. त्यापैकी १०१ कोटी ५५ लाख ६९ हजार ३१५ रुपयांची वसुली करण्यात आली आहे. तर, पाणीपट्टी वसुलीचे ५७ कोटी ४२ लाख ८३ हजार ४५४ चे उद्दिष्टे ग्रामपंचायत विभागाला दिले असून, ३९ कोटी ५५ लाख ६३ हजार ८१८ रुपयांची वसुली करण्यात आली आहे.
मार्चमध्ये लोकअदालत
दरम्यान, जिल्ह्यातील करवसुलीवर भर देत मुख्यमंत्री समृद्धी पंचायतराज अभियानांतर्गत ३१ मार्च मुदतवाढ देण्यात आली आहे. तर, मार्चमध्ये पार पडणाऱ्या राष्ट्रीय लोक अदालतीत थकबाकीची प्रकरणे ठेवण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे यांनी दिली. तसेच त्या माध्यमातून करवसुली होण्यास मदत होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
करवसुली स्थिती (आर्थिक वर्ष २०२५-२६) (रुपयांत)
कर प्रकार उद्दिष्ट रक्कम प्रत्यक्ष वसुली
दिवाबत्ती कर (थकबाकीसह) ८,७९,३८,२७७ ५,३२,०१,३२०
आरोग्य कर (थकबाकीसह) ३,०२,८४,६८० २,०८,०३,४२८
घरपट्टी १,४३,८१,५६,७८९ १,०१,५५,६९,३१५
पाणीपट्टी ५७,४२,८३,४५४ ३९,५५,६३,८१८
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.