मुंबई

नालासोपारा हादरलं, दगडाने ठेचून तरुणाची हत्या

CD

नालासोपाऱ्यात दगडाने ठेचून
तरुणाची हत्या; आरोपी अटकेत

बोळिंज, ता. २१ (बातमीदार) ः नालासोपाऱ्यात दगडाने ठेचून एका तरुणाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शुक्रवारी (ता. २०) रात्री ११.३०च्या सुमारास ही घटना घडली. शुभम मिश्रा (३१) असे मयत तरुणाचे नाव असून, जुन्या वादातून या तरुणाची हत्या झाली असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.
शुभम मिश्रा हा नालासोपारा पूर्वेच्या गालानगर परिसरात राहत होता. काही दिवसांपूर्वी त्याचा काही तरुणांसोबत वाद झाला. शुक्रवारी रात्री शुभम व त्याचे मित्र एका हॉटेलमध्ये मद्यपान करीत असताना पूर्वीच्या जुन्या भांडणावरून वाद झाला. त्याच दिवशी आरोपींनी शुभम याला काही कारणास्तव नालासोपारा पश्चिमेच्या हनुमान मंदिराच्या समोरच्या टपरीजवळ बोलावून शुभम याच्या मांडीवर चाकूने वार केले. दरम्यान, त्याला डोक्यात व चेहऱ्यावर दगडाने मारण्यात आले. त्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच, नालासोपारा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व पंचनामा करून शुभम मिश्राचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. याप्रकरणी नालासोपारा पोलिस ठाण्यात अंकित ब्रिजेश पांडे यांच्या तक्रारीवरून रोशन सिंग, जगन मेहंदी, सुनील मालुसरे ऊर्फ बिगशो, सूरज सिंग ऊर्फ कबाते, टिंकल मिश्रा आणि इतर चार ते पाच साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

kolhapur Danoli killing case : दानोळी २५ लाखांच्या अपहरण करून खून प्रकरणाला नवे वळण; एकावर डोळा, दुसऱ्यावर गेम, गुप्तांगाला दिला विजेचा शॉक

Pune Airport: पुणे विमानतळ धावपट्टीचे काम पावसाळ्यानंतरच; उन्हाळी हंगामामुळे दुरुस्ती लांबणीवर, ‘नोटम’ कालावधीत काम होणार!

जातीचा दाखला कैसा बनाया? सहर शेख अडचणीत, ४ कार्यालयांना फसवलं; नगरसेवकपद धोक्यात

Nirav Modi Extradition Update : नीरव मोदीला भारतात आणलं जाणार? CBIची टीम लंडनमध्ये

IPL 2026: मुंबई इंडियन्सचं टेन्शन आणखी वाढणार... रोहित शर्मा MI vs PBKS मॅच खेळणार की नाही? जाणून घ्या काय आहे अपडेट

SCROLL FOR NEXT