फिट इंडियाच्या धर्तीवर ''फिट मुंबई''
''फिट मुंबई'' अंतर्गत वांद्रे येथे फिट सॅटर्डे मोहीम संपन्न
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ ः धावपळीच्या जीवनात स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे तितकेच गरजेचे आहे. मुंबईकरांचे आरोग्य सृदृढ राहावे यासाठी फिट इंडियाच्या धर्तीवर महापालिकेतर्फे फिट मुंबईअंतर्गत फिट सॅटर्डे ही मोहीम राबविण्यात येत आहे. नियमित व्यायाम करण्यासाठी प्रेरित करणे हा फिट सॅटर्डे या मोहिमेचा उद्देश आहे. नागरिकांनी त्यात उत्स्फूर्त सहभाग घ्यावा, असे आवाहन अतिरिक्त महापालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे यांनी केले.
वांद्रे येथील एमआयजी क्लब येथे आयोजित फिट सॅटर्डे उपक्रमात डॉ. ढाकणे शनिवारी बोलत होते. मुंबईकर नागरिकांचे आरोग्य सुदृढ आणि दैनंदिन जीवनशैली तंदुरुस्त राहावी, या उद्देशाने फिट इंडियाच्या धर्तीवर बृहन्मुंबई महापालिकेतर्फे फिट मुंबई पुढाकारअंतर्गत फिट सॅटर्डे ही मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेचा आरंभ गतवर्षी २५ ऑक्टोबर २०२५ वांद्रे किल्ला उद्यान येथे करण्यात आला. यापुढे प्रत्येक शनिवारी सकाळी ६.३० वाजता वांद्रे येथील किल्ला उद्यान परिसर आणि एमआयजी क्लब या ठिकाणी ही मोहीम पार पडणार आहे. तसेच भारतीय क्रीडा प्राधिकरण आणि फिट इंडिया मूव्हमेंट यांच्या सहकार्याने महापालिकेच्या सर्व २६ प्रशासकीय विभागांमध्ये ही मोहीम राबविण्याचे प्रस्तावित आहे.
---
‘फिटनेस दिल से’ घोषवाक्य
फिट मुंबई या अभियानाचे घोषवाक्य ‘फिटनेस दिल से’ असे असून, प्रत्येक मुंबईकराच्या फिटनेस प्रवासाला नवी दिशा देत आहे. ही केवळ मोहीम नसून, मुंबईकरांनी मुंबईकरांसाठी सुरू केलेली एक चळवळ आहे. ही चळवळ अधिक प्रबळ करण्यासाठी अधिकाधिक नागरिकांनी सहभागी होऊन या मोहिमेला पाठबळ द्यावे, असे आवाहन महापालिका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
--
मोहिमेनिमित्त उपक्रम
- प्रत्येक शनिवारी सकाळी ६.३० वाजता उद्याने आणि मैदानांवर फिटनेस सत्रांचे आयोजन
- शिवयोग केंद्राच्या माध्यमातून योग, ध्यानधारणा आणि प्राणायाम सत्र
- शाळकरी तसेच महाविद्यालयीन तरुणांसाठी शारीरिक व्यायाम सत्र
- कमी वयातच व्यायामाचे महत्त्व पटवून देण्यासाठी स्पर्धांचे आयोजन
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.