मुरूडमध्ये शिवजयंती उत्साहात
मुरूड, दि. २१ (बातमीदार) : मुरुड-जंजिरा नगरपरिषद व शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. बापूजी देव मंदिर, लक्ष्मीखार येथून शिवप्रतिमेची भव्य मिरवणूक ढोल-लेझीमच्या गजरात काढण्यात येऊन नगरपरिषद प्रांगणात समारोप झाला. वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांनी प्रभावी सादरीकरण करून दाद मिळवली. इयत्ता १ ली ते १५ वीपर्यंतच्या गटांतील प्रथम क्रमांक विजेत्यांना प्रशस्तीपत्र व रोख बक्षिसे देण्यात आली. राघव सिद्धेश करंबे याने सादर केलेल्या शिवपोवाड्याने उपस्थितांची मने जिंकली. नगराध्यक्षा आराधना दांडेकर यांनी अध्यक्षीय भाषणात शिवरायांचे विचार जीवनात अंगीकारण्याचे आवाहन केले. कार्यक्रमास नगरपरिषदेचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.