मुंबई

डंपरचा धक्का लागताच दुचाकीस्वार थेट खोल खड्ड्यात;

CD

डम्परचा धक्का लागून
दुचाकीस्वार खड्ड्यात
​कल्याण, ता. २१ (बातमीदार) : कल्याण पूर्वेकडील पुणे लिंक रोडवर शनिवारी (ता. २१) धक्कादायक घटना घडली. एका हॉटेलसमोरील रस्त्यावर सुरू असलेल्या जलवाहिनीच्या कामासाठी खोदण्यात आलेल्या मोठ्या खड्ड्यात एक दुचाकीस्वार थेट वाहनासह कोसळला. डम्परचा पाठीमागून धक्का बसल्याने हा युवक नियंत्रणाबाहेर जाऊन थेट खड्ड्यात पडल्याची माहिती समोर आली आहे. या भीषण अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून ही संपूर्ण घटना जवळच असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.
​पुणे लिंक रोडवर सध्या जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. यासाठी रस्त्याच्या एका बाजूला मोठा आणि खोल खड्डा खोदण्यात आला आहे. दरम्यान, एक दुचाकीस्वार या मार्गावरून जात असताना, पाठीमागून एका डम्परची त्याच्या दुचाकीला धडक बसली. या धक्क्यामुळे दुचाकीस्वार वाहनासह थेट खोदलेल्या खड्ड्यात कोसळला.
अपघात घडताच परिसरातील नागरिकांनी खड्ड्याकडे धाव घेतली. खड्डा खोल असल्याने आणि त्यात पाइप असल्याने दुचाकीस्वाराला बाहेर काढण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागले. स्थानिक तरुणांनी खड्ड्यात उतरून जखमी युवकाला बाहेर काढले आणि तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. ‘सकाळ’ने काही दिवसांपूर्वीच याच भागातील खोदकामामुळे पदपथांचे नुकसान झाल्याबाबत वृत्त प्रसारित केले होते. त्यामुळे पदपथ चालण्यासाठी धोकादायक झाले असून अपघाताची शक्यता वर्तविण्यात आली होती. त्यानंतर आता याच कामामुळे अपघात झाल्याचे समोर आले आहे.

स्थानिक रहिवाशांनी या घटनेनंतर संताप व्यक्त केला आहे. वर्दळीच्या रस्त्यावर जलवाहिनीचे काम सुरू असताना पुरेशी सुरक्षाव्यवस्था का केली नव्हती, असा सवाल उपस्थित केला जात आहे. तसेच अरुंद रस्त्यावर अवजड वाहनांची वेगमर्यादा आणि चालकांचा ओव्हरटेक करताना होणारी निष्काळजी यावरही नागरिकांनी टीका केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat: अशोक खरातच्या अत्यंत जवळच्या माणसाचा अपघाती मृत्यू; शिर्डी जमीन घोटाळ्यात होते साक्षीदार

Fake Alphonso Mango in Nipani : हापूसच्या पेटीत कर्नाटकी आंबा! बाजारात ग्राहकांची मोठी फसवणूक; 700 ते 800 रुपये दराने मिळतोय आंबा

Pune Sugar Protest: शेतकऱ्यांचा एल्गार!घामाच्या पैशासाठी 'आरपार'ची लढाई; ३० एप्रिलपासून पुण्यातील साखर संकुलाला बेमुदत वेढा..

Success Story: ग्रामीण भागातून न्यायालयापर्यंतचा प्रवास; कल्पेश कड न्यायाधीशपदी विराजमान, जिद्द आणि मेहनतीचा विजय!

मालिकेच्या प्रोमोशनसाठी अनोखा प्रयोग ! दांगट कुटूंबाने चक्क आंब्यांनी केली एकुलत्या एक सुनेची तुला

SCROLL FOR NEXT