मुंबई

डम्परचा धक्का लागून दुचाकीस्वार खड्ड्यात

CD

कल्याण, ता. २१ (बातमीदार) : कल्याण पूर्वेकडील पुणे लिंक रोडवर शनिवारी (ता. २१) धक्कादायक घटना घडली. एका हॉटेलसमोरील रस्त्यावर सुरू असलेल्या जलवाहिनीच्या कामासाठी खोदण्यात आलेल्या मोठ्या खड्ड्यात एक दुचाकीस्वार थेट वाहनासह कोसळला. डम्परचा पाठीमागून धक्का बसल्याने हा युवक नियंत्रणाबाहेर जाऊन थेट खड्ड्यात पडल्याची माहिती समोर आली आहे. या भीषण अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून ही संपूर्ण घटना जवळच असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.

पुणे लिंक रोडवर सध्या जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. यासाठी रस्त्याच्या एका बाजूला मोठा आणि खोल खड्डा खोदण्यात आला आहे. दरम्यान, एक दुचाकीस्वार या मार्गावरून जात असताना, पाठीमागून एका डम्परची त्याच्या दुचाकीला धडक बसली. या धक्क्यामुळे दुचाकीस्वार

वाहनासह थेट खोदलेल्या खड्ड्यात कोसळला. अपघात घडताच परिसरातील नागरिकांनी खड्ड्याकडे धाव घेतली.

स्थानिक तरुणांनी खड्ड्यात उतरून जखमी युवकाला बाहेर काढले आणि तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. ‘सकाळ’ने काही दिवसांपूर्वीच याच भागातील खोदकामामुळे पदपथांचे नुकसान झाल्याबाबत वृत्त प्रसारित केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Weather: मुंबईला प्रदूषणाचा विळखा! हवेचा दर्जा खालावला; धोक्याची पातळी ओलांडल्याने आरोग्यतज्ज्ञांचं महत्त्वाचं भाकीत

Crime: लग्नाआधीच मेहंदी समारंभावेळी दोन्ही बहिणींनी जीवन संपवलं; एक तांत्रिक संबंध समोर; मृत्यूचं नेमकं गूढ काय?

बापरे! लिव्हर कॅन्सरनंतर दीपिकाच्या पोटात निघाली गाठ, अभिनेत्री व्हिडिओ शेअर करत म्हणाली...'आता मला खूप जास्त भीती...'

Sangli Miraj Crime : घरखर्चासाठी पोटच्या दोन मुलांची चाळीस हजारांत विक्री, मिरजेतील महिलेचे कृत्य; संशयित मनपाच्या रुग्णालयातील

India Brazil Trade: ब्राझीलकडून मिळणार खनिजे; संरक्षण क्षेत्रातील सहकार्यालाही आणखी बळ

SCROLL FOR NEXT