मुंबई

न्यायालयाच्या आदेशानंतरही सदनिकेत बेकायदेशीर प्रवेश

CD

न्यायालयाच्या आदेशानंतरही सदनिकेत बेकायदेशीर प्रवेश
मायलेकीसह जावईविरोधात गुन्हा दाखल
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २२ : न्यायालयाच्या आदेशानुसार कायदेशीर प्रक्रियेद्वारे ताब्यात घेतलेल्या सदनिकेचे सील आणि कुलूप तोडून बेकायदेशीरपणे पुन्हा प्रवेश केल्याचा प्रकार ठाण्यात समोर आला आहे. याप्रकरणी मायलेकीसह जावईविरोधात वर्तकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील शिवकृपा सहकारी पतपेढीचे वसुली अधिकारी अशोक फडतरे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.
लोकमान्यनगर येथील रहिवासी रोहिणी निंबाळकर यांनी त्यांच्या मालकीची सदनिका तारण ठेवून २९ जानेवारी २०१९ रोजी संस्थेकडून १० लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. कर्ज प्रकरणात कस्तुरी मलबारी व कुणाल मलबारी हे सहकर्जदार होते. सुरुवातीला काही हप्ते भरल्यानंतर कर्जफेड थांबविण्यात आल्याने खाते थकीत झाले. यानंतर महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमाअंतर्गत उपनिबंधक यांच्याकडे दावा दाखल करण्यात आला. संबंधितांना थकबाकी भरण्यास मुदत देऊनही भरणा न झाल्याने वसुली दाखला देण्यात आला.
४ फेब्रुवारी २०२५ रोजी ठाणे मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाने स्थावर मालमत्तेचा ताबा मिळविण्यासाठी दावा दाखल केला. न्यायालयाने ३ मे २०२५ रोजी कोर्ट कमिशनर ॲड. वृषाली पाटील यांची नियुक्ती करून आदेश दिल्यानुसार २५ जुलै २०२५ रोजी पोलिस संरक्षणात सदनिकेचा ताबा संस्थेकडे देण्यात आला. मात्र, १३ ऑगस्ट २०२५ रोजी तक्रारदार यांनी जागेची पाहणी केली असता, थकबाकीदार रोहिणी निंबाळकर, कस्तुरी मलबारी व कुणाल मलबारी यांनी सीलबंद कुलूप तोडून बळजबरीने सदनिकेत प्रवेश करून पुन्हा ताबा घेतल्याचे निदर्शनास आल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. याप्रकरणी त्या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, वर्तकनगर पोलिस पुढील तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SL vs ENG, T20 WC : फिरकीसमोर इंग्लंडची गिरकी! श्रीलंकेची सुपर ८च्या पहिल्याच सामन्यात जबदरस्त कामगिरी

Mumbai-Pune: मोठी बातमी! मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहतूक कोंडीत अडकलेल्या वाहनांना टोलचे पैसे परत मिळणार; पण कधी? जाणून घ्या...

संतापजनक! खाजगी शाळेत १३ वर्षीय विद्यार्थिनीवर ५ शिक्षकांचा वर्षभर वारंवार अत्याचार, कुटुंबाला सांगताच...; काय घडलं?

Satej Patil: झिरवळांच्या कार्यालयात ACB ची धाड, फडणवीसांच्या परवानगी शिवाय नाही; अधिवेशनापूर्वी सतेज पाटलांनी उपस्थित केला कळीचा मुद्दा

प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! भुरीकवठे-कर्नाटक रस्त्याने दळणवळण सुधारणार; विजयपूरपर्यंत होणार महामार्ग; मंत्री नितीन गडकरींची घाेषणा..

SCROLL FOR NEXT