घरातून डायमंड चेन चोरी
ठाणे : घोडबंदर रोड येथील एका घरातून हिऱ्याची सोनसाखळी चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. पल्लवी यजवेद्र सिंग यांनी याप्रकरणी कासारवडवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या सोनसाखळीची किंमत ७५ हजार रुपये असल्याचे तक्रारीत नमूद आहे. बुधवारी (ता. १८) रात्री गळ्यात असलेली सोनसाखळी दुसऱ्या दिवशी सकाळी घरातून गायब झाल्याचे निदर्शनास आले. शोध घेऊनही दागिना न मिळाल्याने घरकामासाठी येणाऱ्या दोन महिलांवर संशय व्यक्त करण्यात आला आहे.
......
गावठी दारू विक्रीप्रकरणी महिलेविरुद्ध गुन्हा
ठाणे : घोडबंदर रोड परिसरात गावठी हातभट्टीची दारू विक्री करताना ६० वर्षीय कविता ठाकूर नामक महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले. शुकर्वारी (ता. २०) ही महिला गावठी दारू बाळगून विक्री करताना आढळून आली. याप्रकरणी तिच्याविरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अंतर्गत कासारवडवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.