मुंबई

३० मोबाईलसह चोरटा जेरबंद

CD

३० मोबाईलसह चोरटा जेरबंद
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २२ : कासारवडवली पोलिस ठाण्याच्या हद्दीत मोबाईल दुकानाचे शटर उचकटून मोबाईल चोरणाऱ्या अकबर ऊर्फ पापा शौकत अली शाह या चोरट्याला ठाणे शहर पोलिसांच्या वागळे गुन्हे शाखेने जेरबंद केले. त्यांच्याकडून विविध कंपन्यांचे ३० मोबाईल हस्तगत केले असून त्या मोबाईलची किंमत पाच लाख २९ हजार १०१ रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
तपासादरम्यान गुरुवारी (ता. १९) गुप्त बातमीदारामार्फत अकबर हा नायगाव पूर्व येथील चिंचोटी गाव परिसरात स्वतःचे अस्तित्व लपवून राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार छापा टाकून त्याला अटक करण्यात आली. तो राहत असलेल्या खोलीची झडती घेतली असता विविध कंपन्यांचे एकूण ३० मोबाईल फोन जप्त करण्यात आले. तपासात हे सर्व मोबाईल कासारवडवली पोलिस ठाणे हद्दीतून चोरीस गेले असल्याचे निष्पन्न झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Airport: दिल्ली विमानतळावर थरारक क्षण! दोन विमानांच्या पंख्याची धडक, काही सेकंदांत वाचले शेकडो जीव

भारतातील नवीन ग्रॅज्युएट्ससाठी AI स्पेशलिस्ट' अन् 'कंटेंट क्रिएटर' ठरतायेत टॉप करिअर ट्रेंड्स! LinkedIn ‘Grads Guide 2026’ अहवाल

Pali News : प्रवाशांचे हाल थांबणार! सर्व अडथळे दूर करत रोहा-पुणे एसटी अखेर बसस्थानकात दाखल

Who is Navnita Gautam? विराट कोहली, स्मृती मानधना यांना 'फिट' ठेवणारी नवनीता गौतम; RCB ने तिच्यासाठी घेतलेला ऐतिहासिक निर्णय

Latest Marathi News Live Update : हरिवंश यांची राज्यसभेचे उपसभापती म्हणून निवड केली जाईल

SCROLL FOR NEXT