मुंबई

कल्याण पूर्वेतील शिवप्रेरणा यात्रेत ५०० हून अधिक वारकऱ्यांचा जागर

CD

शिवप्रेरणा यात्रेत ५०० हून अधिक वारकऱ्यांचा जागर
आचार्य प्रल्हाद शास्त्री आणि संजय राघो काळोखे ‘शिवकल्याण पुरस्कारा’ने सन्मानित
कल्याण, ता. २२ (वार्ताहर) : सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळ यांच्या वतीने सिद्धार्थनगर येथील कर्मवीर दादासाहेब गायकवाड क्रीडांगणावर शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला वारकरी संप्रदायाच्या सुमारे ५०० हून अधिक जणांनी सहभाग घेऊन हरिनामाचा गजर केला. या उत्सवात कल्याण पूर्वेच्या नावलौकिकात भर घालणारे आचार्य प्रल्हाद शास्त्री आणि संजय राघो काळोखे यांना ‘शिवकल्याण २०२६’ हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
या वेळी आचार्य प्रल्हाद शास्त्री आणि संजय काळोखे यांना आमदार सुलभा गायकवाड, पोलिस उपायुक्त अतुल झेंडे, सहाय्यक पोलिस आयुक्त कल्याणजी घेटे या मान्यवरांच्या हस्ते शिवकल्याण पुरस्कार प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह, शाल आणि श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप होते. कार्यक्रमात सुमारे ५०० वारकऱ्यांच्या उपस्थितीत सामूहिक हरिपाठ करण्यात झाला. या समयी हरिनामाच्या गजराने परिसरात भक्तिमय वातावरण झाले होते.
‘नामात विठ्ठल, कर्मात शिवराय’ या संकल्पनेनुसार आणि हभप जगन्नाथ नेहरकर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडल्याची भावना मंडळाचे विश्वस्त नरेंद्र सूर्यवंशी आणि विष्णू जाधव यांनी व्यक्त केली. याप्रसंगी नगसेवक रमेश जाधव, नीलेश शिंदे, सचिन पोटे, नगसेविका मनीषा गायकवाड, माजी नगरसेवक अभिमन्यू गायकवाड यांच्यासह संजय मोरे, सुभाष म्हस्के, राजू अंकुश, रमाकांत देवळेकर, विवेक जगताप, प्रभाग ४ जे च्या सहाय्यक आयुक्त सविता हिले आदी मान्यवर आणि विविध संस्था संघटनांचे प्रतिनिधी, शिवप्रेमी नागरीक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

शिवरायांची प्रेरणा यात्रा प्रमुख आकर्षण
छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा यात्रा कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले. या यात्रेत द्वारका विद्या मंदिर, नूतन ज्ञान मंदिर, मॉडेल कॉलेज आणि हायस्कूल, जय हनुमान दांडपट्टा पथक, तिसाई बिट्स बॅण्ड पथक, बासरीवाला ढोल ताशा पथक, मैत्रेय संगत, सहयोग सामाजिक संस्था, शाम गुप्ता आणि पथक आदी संस्था संघटनांच्या सहभागासह कल्याण शहर वारकरी सांप्रदाय प्रबोधन ट्रस्ट या संस्थेचे ५००हून अधिक वारकरी आणि सेवेकरी सहभागी झाले होते. ढोल-ताशांच्या गजरात आणि जयघोषात निघालेल्या या मिरवणुकीत शिवप्रेमी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SL vs ENG, T20 WC : फिरकीसमोर इंग्लंडची गिरकी! श्रीलंकेची सुपर ८च्या पहिल्याच सामन्यात जबदरस्त कामगिरी

Mumbai-Pune: मोठी बातमी! मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहतूक कोंडीत अडकलेल्या वाहनांना टोलचे पैसे परत मिळणार; पण कधी? जाणून घ्या...

संतापजनक! खाजगी शाळेत १३ वर्षीय विद्यार्थिनीवर ५ शिक्षकांचा वर्षभर वारंवार अत्याचार, कुटुंबाला सांगताच...; काय घडलं?

Satej Patil: झिरवळांच्या कार्यालयात ACB ची धाड, फडणवीसांच्या परवानगी शिवाय नाही; अधिवेशनापूर्वी सतेज पाटलांनी उपस्थित केला कळीचा मुद्दा

प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! भुरीकवठे-कर्नाटक रस्त्याने दळणवळण सुधारणार; विजयपूरपर्यंत होणार महामार्ग; मंत्री नितीन गडकरींची घाेषणा..

SCROLL FOR NEXT