मुंबई

शिक्षण हेच वाघिणीचे दूध आहे - आमदार राजेंद्र गावित

CD

शिक्षण हेच वाघिणीचे दूध : आमदार राजेंद्र गावित

वाणगाव, ता. २२ (बातमीदार) : डहाणू तालुक्यातील आसनगाव येथे वि. म. पाटील कृषी प्रतिष्ठानच्या गुरुकुल शिक्षण संकुलात ‘अस्तित्व २०२६’ वार्षिक स्नेहसंमेलन व पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. राज्याचे माजी राज्यमंत्री व विद्यमान आमदार राजेंद्र गावित यांनी शिक्षण ही समाज परिवर्तनाची सर्वात प्रभावी शक्ती असल्याचे प्रतिपादन करत ग्रामीण विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांकडे लवकर वळावे, असे आवाहन केले. उत्तम शिक्षण हेच वाघिणीचे दूध आहे, असे ते म्हणाले.
कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून शिवसेना जिल्हाप्रमुख कुंदन संखे उपस्थित होते. या वेळी डहाणूचे लोकनियुक्त नगराध्यक्ष राजेंद्र माच्छी यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. तसेच नगर परिषदेच्या गटनेत्या कीर्ती मेहता व इतर नगरसेविकांचाही गौरव करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष मिलिंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली फार्मसी, डिझाइन, लॉ, हॉटेल मॅनेजमेंट व कृषी विभागांच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा आयोजित करण्यात आला. आदिवासी व दुर्गम भागात गुणवत्तापूर्ण शिक्षण देत नवा आदर्श निर्माण केल्याबद्दल संस्थेच्या कार्याचे मान्यवरांनी कौतुक केले. मान्यवरांची ढोल-ताशांच्या गजरात जंगी मिरवणूक काढण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले व मा. सरस्वती देवी यांच्या प्रतिमांचे पूजन करून राष्ट्रगीताने झाली.
याप्रसंगी पालघर जिल्ह्यातील शिक्षकांना जीवनगौरव, आदर्श मुख्याध्यापक व आदर्श शिक्षक अशा विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलाविष्कारांनी उपस्थित हजारो रसिक प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांना दिनदर्शिका वितरित करण्यात आली. सोहळ्यास पालघर जिल्ह्यातील मान्यवर, शिक्षक, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT