मुंबई

दिव्यांग विद्यार्थ्यांचा महाराजांना मानाचा मुजरा

CD

विद्यार्थ्यांचा महाराजांना मानाचा मुजरा

विक्रमगड (बातमीदार) : तालुक्यातील झडपोली येथील जिजाऊ अंध व मतिमंद मुलांच्या निवासी शाळेत महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरी करण्यात आली. दिव्यांग विद्यार्थ्यांनी अत्यंत भावपूर्ण वातावरणात महाराजांना मानाचा मुजरा करत अभिवादन केले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. विद्यार्थ्यांनी महाराजांच्या जीवनकार्यावर आधारित गीते, पोवाडे व प्रभावी भाषणे सादर केली. पाळणा गीत सादर करत त्यांनी आनंद द्विगुणित केला. शेवटी सर्व विद्यार्थ्यांनी महाराजांना साष्टांग दंडवत प्रणाम करून कृतज्ञता व्यक्त केली. या वेळी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्य, पराक्रम व स्वराज्य स्थापनेच्या कार्याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला महेश गायकवाड, जितेंद्र वाघ, राम गोविंद तसेच जव्हार बायफ संस्थेचे कर्मचारी विशाल करपे, रघुनाथ जगताप व त्यांचे सहकारी उपस्थित होते. शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचीही उपस्थिती होती. कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना जागृत झाली असून जयंती सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Buldhana Shivaji Maharaj Statue Row : चिखला गावचे फरार सरपंच Ganesh Kakad कोण? पहिल्यांदाच समोर येत व्हिडिओद्वारे दिली प्रतिक्रिया

SL vs ENG, T20 WC: W,W,W,W,W ! श्रीलंकेचा निम्मा संघ ३४ धावांत तंबूत; इंग्लंडच्या पार्टटाईम फिरकीपटू विल जॅक्सने वाढवली डोकेदुखी

Pune News: रुग्णांच्या जिवाशी खेळ, निकृष्ट औषधे वितरित; थेरगाव रुग्णालयातील प्रकार, तब्बल १६ हजार गोळ्यांची बॅच परत, चौकशीचे आदेश!

Mumbai Traffic: मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी वाहतुकीवर कडक निर्बंध! अनेक रस्ते बंद; तर पार्किंगवर बंदी, मार्गदर्शक तत्त्वे काय?

Railway News: ट्रेन तिकीट बुक करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! आयआरसीटीसीकडून मोठे बदल; प्रवाशांना दिलासा, नवे अपडेट काय?

SCROLL FOR NEXT