मुंबई

खड्ड्यांच्या समस्येबाबत काँग्रेसकडून महापौरांना निवेदन

CD

खड्ड्यांच्या समस्येबाबत काँग्रेसकडून महापौरांना निवेदन

विरार, ता. २२ (बातमीदार) : वसई-विरार शहर महापालिका हद्दीतील तसेच राज्य महामार्गावरील रस्त्यांवरील वाढत्या खड्ड्यांच्या समस्येबाबत वसई-विरार शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने महापौर अजीव पाटील यांना निवेदन सादर केले आहे. शहरातील नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन तातडीने दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, अशी मागणी शिष्टमंडळाने या वेळी केली आहे.
काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष कुलदीप वर्तक यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की पावसाळ्यानंतर शहरातील बहुतांश रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून वाहनचालक, प्रवासी, शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक तसेच सर्वसामान्य नागरिकांना प्रवासादरम्यान मोठा त्रास सहन करावा लागत आहे. खड्ड्यांमुळे वारंवार अपघात होत असून, नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. खड्ड्यांमुळे वाहनांचा वेग कमी होत असल्याने वाहतूक कोंडी वाढत आहे. परिणामी वेळेचा अपव्यय होतो तसेच इंधनावरही मोठ्या प्रमाणावर खर्च होत आहे. राज्य महामार्गावरील रस्त्यांची स्थितीही चिंताजनक असून, या मार्गांवरून मंत्री, पालकमंत्री, अधिकारी तसेच विविध मान्यवरांचा सतत प्रवास होत असतो. तरीदेखील रस्त्यांच्या दुरवस्थेकडे दुर्लक्ष होत असल्याची टीका काँग्रेसने केली आहे.
---------------
नवीन महापौरांनी या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने सर्व रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी संबंधित विभाग व ठेकेदारांना कठोर सूचना द्याव्यात, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. नागरिकांना सुरक्षित आणि सुरळीत प्रवासाची हमी देण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशीही विनंती करण्यात आली आहे. शहरातील रस्तेदुरुस्तीचे काम पारदर्शकपणे आणि दर्जेदार पद्धतीने करण्यात यावे, असे निवेदनात शेवटी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat: अशोक खरातच्या अत्यंत जवळच्या माणसाचा अपघाती मृत्यू; शिर्डी जमीन घोटाळ्यात होते साक्षीदार

Fake Alphonso Mango in Nipani : हापूसच्या पेटीत कर्नाटकी आंबा! बाजारात ग्राहकांची मोठी फसवणूक; 700 ते 800 रुपये दराने मिळतोय आंबा

Latest Marathi News Live Update: अशोक खरातच्या ओकस कार्यालयात ईडीकडून गेल्या तीन तासांपासून झडती सुरू

Pune Sugar Protest: शेतकऱ्यांचा एल्गार!घामाच्या पैशासाठी 'आरपार'ची लढाई; ३० एप्रिलपासून पुण्यातील साखर संकुलाला बेमुदत वेढा..

Success Story: ग्रामीण भागातून न्यायालयापर्यंतचा प्रवास; कल्पेश कड न्यायाधीशपदी विराजमान, जिद्द आणि मेहनतीचा विजय!

SCROLL FOR NEXT