नवी मुंबई, ता. २२ (वार्ताहर) : खारघर परिसरातून १३ वर्षीय मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला फूस लावून पळवून नेत तिच्यावर अत्याचार करणाऱ्या संशयिताच्या खारघर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. रोशन वाघे याला पोलिसांनी पुण्यातील सुपे येथून अटक केली आहे. तसेच त्याच्या ताब्यातून पीडित मुलीची सुटका करून तिला तिच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिले आहे.
खारघर परिसरात आई-वडिलांसोबत राहणारी १३ वर्षीय मुलगी सध्या शिक्षण घेत आहे, तर रोशन हा पनवेलच्या करंजाडे भागात राहण्यास असून, तो विवाहित आहे. तसेच त्याला एक मुलगादेखील आहे. त्याने पीडित मुलीसोबत समाजमाध्यमावरून मैत्री केली होती. त्यानंतर त्याने मुलीसोबत प्रेमसंबंध निर्माण करून तिला लग्नाचच्या भूलथापा दिल्या होत्या. २ फेब्रुवारीला मध्यरात्री त्याने मुलीला फूस लावून पळवून नेले होते. घरातून मुलगी अचानक बेपत्ता झाल्याचे लक्षात येताच, तिच्या कुटुंबीयांनी पहाटेपासूनच शोधाशोध केली. मात्र, ती कुठेच सापडली नाही. अखेर त्यांनी खारघर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली होती.
पोलिसांनी केलेल्या तपासात मुलगी ही समाजमाध्यमावर रोशन वाघे याच्यासोबत संपर्कात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारावर त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. सुरुवातीला त्याचा मोबाईल बंद असल्याने पोलिसांना त्याच्या ठावठिकाणा मिळत नव्हता. त्याने फोन सुरू करताच सुपे येथील ठिकाण पोलिसांना मिळाले. त्यानुसार पोलिसांनी गुरुवारी (ता. १९) सुपे येथून त्याला अटक केली. तसेच मुलीची सुटका केली. तिला सुपे येथील मामाच्या झोपडीत नेऊन ठेवले होते. यादरम्यान त्याने तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवल्याचे तपासात आढळून आले. त्यामुळे अपहरणासह बलात्कार आणि पोक्सोअंतर्गत गुह्याची वाढ करण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रदीप आव्हाड यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.