नवी मुंबई, ता. २४ (वार्ताहर) : एपीएमसीतील फळ बाजारामध्ये अमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या एका तरुणाला एपीएमसी पोलिसांनी शिताफीने अटक केली. शाहरुख साजीद खान (वय ३४) याच्याजवळ असलेला दोन किलो ६१९ ग्रॅमचा एक लाख १७ हजारांचा गांजा पोलिसांनी जप्त केला. हा गांजा त्याला हर्षद नामक व्यक्तीने विक्रीसाठी दिल्याचे तपासात आढळून आले आहे. त्यानुसार पोलिसांनी हर्षदचा शोध सुरू केला आहे.
शाहरुख खान हा घणसोलीत राहण्यास असून, गुरुवारी (ता. १९) रात्री पावणेनऊ वाजण्याच्या सुमारास तो एपीएमसीतील फळ बाजारामध्ये गांजाविक्रीसाठी आला होता. या वेळी एपीएमसी पोलिसांचे पथक या भागात गस्त घालत असताना, त्यांना शाहरुख खान हा संशयास्पदरीत्या वावरताना आढळून आला. तसेच त्याने पोलिसांना पाहून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्याला पकडून झडती घेतली असता, त्याच्याकडे असलेल्या पिशवीत गांजा आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी शाहरुख खान याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. त्याच्या चौकशीत हर्षद नावाच्या व्यक्तीच्या सांगण्यावरून त्याने हा गांजा विक्रीसाठी आणल्याचे सांगितले. तसेच हा माल विकल्यास त्याला दररोज एक हजार ते १२०० रुपये देण्यात येत असल्याचेदेखील त्याने सांगितले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.