मुंबई

रमजाननिमित्त रसाळ फळांना मागणी

CD

तुर्भे, ता. २३ (बातमीदार) : रमजानमध्ये मुस्लिम धर्मीय रोजा (उपवास) पकडतात आणि सायंकाळी फळे सेवन करून इफ्तारी करतात. त्यामुळे या दिवसात फळांची मागणी मोठी असते. गेल्या आठवड्यापासून रमजानला सुरुवात झाली आहे. त्यामुळे वाशीतील एपीएमसी बाजारात फळांची मागणी वाढल्याने आवकदेखील वाढली आहे. बाजारात रसाळ फळांना मागणी वाढल्याचे व्यापारी सांगत आहेत.

रमजान महिन्यात उपवास करताना मुस्लिम धर्मीय दिवसभर उपवास करतात. सायंकाळी इफ्तार करून उपवास सोडला जातो. हा उपवास सोडताना रसाळ फळांना अधिक मागणी असते. त्यामुळे या दिवसात कलिंगड, पपई, खरबूज, अननस चिकू, द्राक्षे, संत्री अशा फळांना अधिक मागणी असते. त्यामुळे रमजाननिमित्त बाजारपेठेत उलाढाल वाढते. फळ बाजारात फळांमध्ये कलिंगडची जास्त आवक झाली आहे. त्यामुळे सध्याचा उन्हाचा पाहता रमजान उपवासासाठी पुढील काही दिवसांत रसाळ फळांच्या मागणीत आणखी वाढ होण्याची शक्यता फळ व्यापारी संजय पिंपळे यांनी व्यक्त केली.

घाऊक बाजारातील भाव (प्रतिकिलो)
कलिंगड १५ ते २०
अननस ३० ते ५५
खरबूज २५ ते ३०
द्राक्षे १२० ते १३५
संत्रा ५० ते ७५
चिकू ४० ते ८५
पपई १५ ते २२

फळ बाजारातील आवक (क्विंटलमध्ये)
कलिंगड ६,४७०
खरबूज १,२३४
पपई ३,६३०
संत्री १,९६६
अननस १,८०५
द्राक्षे ८१०
चिकू ६५५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Pawar: अजित पवारांनी रोहित पवारांचं लग्न कसं जमवलं? विधानसभेच्या शोकप्रस्तावात सांगितली आठवण

पाकड्यांची रडारड सुरू! आम्हाला 'समान वागणूक' हवीय; क्रिकेट बोर्ड लिहिणार पत्र, IPL फ्रँचायाझींवर पक्षपातीपणाचा आरोप

Contaminated milk tragedy: भेसळयुक्त दुधामुळे ४८ तासांत किडनी निकामी होऊन चौघांचा मृत्यू ; १२ जण रूग्णालयात दाखल

Yerwada Fire : येरवड्यात भीषण आगीमध्ये १५ मोटारींसह ५० दुचाकी जळून खाक

Latest Marathi News Live Update : कुठल्याही अटीशर्ती न टाकता सरसकट कर्जमाफी द्यावी, पुणतांबातील शेतकऱ्यांची मागणी

SCROLL FOR NEXT