मुंबई

आरटीओच्या नावाने लुटणारी टोळी सक्रिय

CD

नवी मुंबई, ता. २२ (वार्ताहर) : राज्यातील वाहनधारक आणि चालकांना लक्ष्य करून त्यांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. वाहनचालक परवाना, वाहन नोंदणी आणि ई-चलान भरण्याच्या नावाखाली नागरिकांची वैयक्तिक माहिती आणि पैसे लुबाडले जात असल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर, परिवहन विभागाने बनावट संकेतस्थळ, संशयास्पद मोबाईल ॲप्स आणि खोट्या ई-चलान लिंकपासून सतर्क राहण्याचे जाहीर आवाहन केले आहे.

फसवणूक करणाऱ्या व्यक्ती एसएमएस किंवा व्हॉट्सॲपद्वारे सामान्य नागरिकांना संदेश पाठवतात. यामध्ये प्रामुख्याने तुमच्या वाहनाचे चलान थकीत आहे, दंड त्वरित भरा किंवा तुमचा परवाना निलंबित होणार असून त्वरित तपासणी करा, अशा धमकीवजा सूचना दिल्या जातात. या संदेशासोबत एक अनधिकृत पेमेंट लिंक पाठवली जाते, ज्यावर क्लिक करताच नागरिकांच्या बँक खात्यावर डल्ला मारला जातो.

घातक एपीके फाईलपासून दूर राहा
परिवहन विभाग कधीही व्हॉट्सॲपवरून कोणतीही पेमेंट लिंक पाठवत नाही. सायबर गुन्हेगार नागरिकांना आरटीओ सर्व्हिस, एम परिवहन अपडेट, ई-चलन पे या नावाने एपीके फाईल्स पाठवून ते डाऊनलोड करण्यास भाग पाडतात. अशा एपीके फाईल्स डाऊनलोड केल्यास मोबाईलमधील ओटीपी, बँकिंग तपशील आणि इतर संवेदनशील माहिती चोरीला जाण्याचा मोठा धोका आहे, असे परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे. तसेच नागरिकांनी केवळ सरकारी नोंदणीकृत असलेल्या अधिकृत संकेतस्थळांचाच वापर करावा, नागरिकांनी केवळ केंद्र सरकारच्या अधिकृत पोर्टलचाच वापर करावा, असे आवाहन सह परिवहन आयुक्त (संगणक) शैलेश कामत यांनी केले आहे.

जर एखाद्या संकेतस्थळाच्या शेवटी कॉम, ऑनलाइन, साईट किंवा इन असेल, तर अशा ठिकाणी आपली खासगी माहिती भरू नका. कोणताही संशयास्पद संदेश किंवा लिंक प्राप्त झाल्यास किंवा फसवणूक झाल्यास नागरिकांनी त्वरित नॅशनल सायबर क्राइम पोर्टलवर, हेल्पलाइन क्रमांक १९३०, अथवा जवळच्या जिल्हा सायबर पोलिस ठाण्यामध्ये तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

अधिकृत संकेतस्थळे
वाहन नोंदणीसाठी vahan.parivahan.gov.in
ड्रायव्हिंग लायसन्ससाठी sarathi.parivahan.gov.in
परिवहन सेवा www.parivahan.gov.in

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MLA Car Bomb Attack : आमदार शौकत मोल्ला यांच्या कारवर बॉम्ब हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ!

T20 World Cup Group 2 Standing: इंग्लंडच्या विजयाने सुपर ८ च्या गटात मोठा उलटफेर; श्रीलंकेसह पाकिस्तानचंही वाढलं टेंशन; जाणून घ्या उपांत्य फेरीचं समीकरण

Talegaon Chakan Road: तळेगाव-चाकण मार्गावर युवक बनले ‘देवदूत’! तातडीच्या प्रयत्नांमुळे अपघात टळले, नेमकं काय घडलं!

Latest Marathi News Live Update : दक्षिण मुंबईतील कोस्टल रोडजवळ भीषण आग

Missing Link project: मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ सुरू होताच टोल दरात बदल होणार का? नवीन नियम काय? महत्त्वाची माहिती आली समोर

SCROLL FOR NEXT