खारघर, ता. २२ (बातमीदार) : सिडकोच्या सीबीडी बेलापूर येथील निबंधक, सहकारी संस्था कार्यालयातील कथित भ्रष्टाचाराच्या विरोधात माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनच्या वतीने उद्या सोमवार (ता. २३)पासून धरणे आंदोलन आणि बेमुदत साखळी उपोषण सुरू करण्यात येणार आहे. या आंदोलनात पनवेल विभागातील हाउसिंग सोसायट्यांचे पदाधिकारी, सभासद, तसेच जागरूक नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.
नवी मुंबईतील बेलापूर येथील सिडकोच्या निबंधक कार्यालयात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप फेडरेशनने केला आहे. या पार्श्वभूमीवर भ्रष्टाचार थांबवण्यासाठी विविध मागण्यांसह हे आंदोलन छेडण्यात येणार आहे. हे धरणे आंदोलन आणि साखळी उपोषण सिडकोच्या बेलापूर येथील अर्बन हट येथे होणार असून, या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन फेडरेशनचे अध्यक्ष सुभाष बसवेकर यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.