मुंबई

वसईतील ऐतिहासिक वस्तूचा जगात डंका

CD

वसईच्या ऐतिहासिक वारशाचा जागतिक डंका
४५२ वर्षे जुन्या ‘पापडी चर्च’ला युनेस्कोचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार
विरार, ता. २२ (बातमीदार) : वसईच्या समृद्ध सामाजिक आणि सांस्कृतिक वारशाची मोहोर आता जागतिक नकाशावर उमटली आहे. वसईतील पापडी येथील ऐतिहासिक ‘अवर लेडी ऑफ ग्रेस कॅथेड्रल’ या चर्चला सांस्कृतिक वारसा संवर्धनासाठी २०२५ चा प्रतिष्ठित ‘युनेस्को आशिया-पॅसिफिक मेरिट पुरस्कार'' जाहीर झाला आहे. २० फेब्रुवारी रोजी बँकॉक येथे झालेल्या सोहळ्यात ही घोषणा करण्यात आली. विशेष म्हणजे, यंदाच्या या सन्मान यादीत स्थान मिळवणारे हे भारतातील एकमेव चर्च आहे.

सोळाव्या शतकातील पोर्तुगीज स्थापत्यशैलीचा नमुना असलेल्या या वास्तूचा जीर्णोद्धार २०२३-२४ मध्ये अत्यंत शास्त्रीय पद्धतीने करण्यात आला. सुमारे ४.७५ कोटी रुपयांच्या लोकवर्गणीतून हे काम पूर्ण झाले. या कामात कुठेही सिमेंटचा वापर न करता, पारंपरिक पद्धतीने ‘चुन्याचा’ वापर करून डागडुजी करण्यात आली आहे. गाभाऱ्यातील लाकडी कोरीवकाम आणि मूळ वैभव टिकवण्यासाठी सवानी हेरिटेज कॉन्सर्व्हेशन, सिक्वेरा फाइन आर्ट्स आणि स्थानिक कुशल कारागिरांनी परिश्रम घेतले.

पुरस्काराचे हे रौप्यमहोत्सवी वर्ष असून, १६ देशांमधून तब्बल ९० नामांकने प्राप्त झाली होती. आंतरराष्ट्रीय ज्युरी समितीने वास्तूचे ऐतिहासिक महत्त्व, तांत्रिक कौशल्य आणि समाजावर होणारा सकारात्मक परिणाम या निकषांवर विजेत्यांची निवड केली. आशिया-पॅसिफिकमधील १० उत्कृष्ट प्रकल्पांमध्ये वसईच्या या कॅथेड्रलने मानाचे स्थान मिळवले आहे. युनेस्कोने आपल्या प्रशस्तिपत्रात म्हटले आहे की, ‘‘महाराष्ट्रातील ख्रिस्ती धर्माच्या प्रसाराचा हा एक जिवंत पुरावा असून, पारंपरिक हस्तकला आणि कोरीवकामाचा सूक्ष्म वापर करून हे प्रार्थनास्थळ जुन्या वैभवात नटले आहे. हे जतन कार्य कौतुकास्पद आहे.

युनेस्कोच्या पुरस्कारांमध्ये हे एकमेव प्रार्थनास्थळ आहे. अवर लेडी ऑफ ग्रेस कॅथेड्रलचा हा सन्मान केवळ वसईकरांसाठीच नव्हे, तर प्रत्येक भारतीयासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे.
- फादर जॉन फर्गोस, धर्मगुरू, अवर लेडी ऑफ ग्रेस कॅथेड्रल

युनेस्को २०२५ मधील १० सर्वोत्कृष्ट प्रकल्प
सिहांग वेअरहाऊस (चीन) : अवॉर्ड ऑफ डिस्टिंक्शन
इवामी गिन्झन ग्रंथालय (जपान) : अवॉर्ड ऑफ डिस्टिंक्शन
अझेके गाव संवर्धन (चीन)
शियानकेंग गाव लँडस्केप (चीन)
अवर लेडी ऑफ ग्रेस कॅथेड्रल (वसई, भारत)
ज्येष्ठ वर्ण महाविहार (नेपाळ)
लोवो निफुग नामरोल नॉरबुलिंग मठ (नेपाळ)
योंग''आन गाव (चीन)
एस्प्लेनेड सीवॉल (मलेशिया)
तन्ना बेट स्थानिक बांधकामे (वानुआटु)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Buldhana Shivaji Maharaj Statue Row : चिखला गावचे फरार सरपंच Ganesh Kakad कोण? पहिल्यांदाच समोर येत व्हिडिओद्वारे दिली प्रतिक्रिया

SL vs ENG, T20 WC: W,W,W,W,W ! श्रीलंकेचा निम्मा संघ ३४ धावांत तंबूत; इंग्लंडच्या पार्टटाईम फिरकीपटू विल जॅक्सने वाढवली डोकेदुखी

Mumbai Traffic: मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी वाहतुकीवर कडक निर्बंध! अनेक रस्ते बंद; तर पार्किंगवर बंदी, मार्गदर्शक तत्त्वे काय?

Railway News: ट्रेन तिकीट बुक करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! आयआरसीटीसीकडून मोठे बदल; प्रवाशांना दिलासा, नवे अपडेट काय?

माओवाद्यांचा सर्वोच्च नेता थिप्परी तिरुपती उर्फ देवजीसह तेलंगणात शरण; दहा कोटींचे होते बक्षीस

SCROLL FOR NEXT