शिवजयंतीनिमित्त एमएसके विद्यालयाची शोभायात्रा
चुनाभट्टी, ता. २२ : चुनाभट्टी परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त उत्साहात आणि जल्लोषात भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेला शाळेच्या अध्यक्षा प्रमिला गोस्वामी, मुख्याध्यापिका संगीता सरमळकर तसेच नवनिर्वाचित नगरसेविका राणी येरूणकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.
शोभायात्रेची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. विद्यार्थ्यांनी लेझीम, ढोल-ताशांच्या गजरात आणि देशभक्तीपर घोषणांनी परिसर दणाणून सोडला. ‘जय भवानी, जय शिवाजी’ अशा घोषणांनी संपूर्ण वातावरण शिवमय झाले होते. याप्रसंगी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शिवरायांचे पराक्रम, शौर्य, स्वाभिमान आणि राष्ट्रप्रेम यांचे महत्त्व सांगितले. समाजात एकात्मता, शिस्त आणि देशभक्तीची भावना रुजविण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. शोभायात्रेत ३०० विद्यार्थी व १८० पालक सहभागी झाले होते.
कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन शाळेच्या शिक्षकवृंद व पालकांच्या सहकार्याने करण्यात आले. शोभायात्रेमुळे परिसरात उत्साहाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.