दिलीप म्हात्रे यांचे निधन
पेण, ता. २२ (बातमीदार) : पेण तालुका ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव दिलीप रामचंद्र म्हात्रे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने ज्येष्ठ नागरिक संघटनांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. म्हात्रे हे रामवाडी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष तसेच वडाव ज्येष्ठ नागरिक संघाचे सल्लागार म्हणून कार्यरत होते. सामाजिक कामाची विशेष आवड असल्याने विविध संस्थांमधून त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला होता. पेण तालुका ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव म्हणून त्यांनी संघटनेची कामे प्रभावीपणे सांभाळत ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने प्रयत्न केले.
---------------------------------------------
रंजना कवाडे यांचे निधन
पेण, ता. २२ (वार्ताहर) : आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी आमदार जोगेंद्र कवाडे यांच्या पत्नी प्रा. रंजना कवाडे यांचे नागपूर येथे अल्पशा आजाराने निधन झाले. त्या ७६ वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनाने आंबेडकरी वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे. पीपल्स रिपब्लिकन पार्टीसह रिपब्लिकन युथ फोर्स, रमाई महिला ब्रिगेड, दलित मुक्ती सेना, राष्ट्रीय मजदूर सेना व राष्ट्रीय विद्यार्थी सेनेच्या कामात त्यांनी सहभाग घेत आंबेडकरवादी विचारांचा प्रसार केला. महिला सक्षमीकरण व युवकांना मार्गदर्शन हे त्यांच्या कार्याचे वैशिष्ट्य होते. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, दोन मुली ॲड. वैशाली कांबळे, जावई ॲड. प्रमोद कांबळे, सून व नातवंडे असा परिवार आहे. अंत्ययात्रेला सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.