मुंबई

३ मार्चला खग्रास चंद्रग्रहण

CD

३ मार्चला खग्रास चंद्रग्रहण
मुंबादेवी मंदिर सकाळी ९ ते दुपारी २पर्यंत खुले

मुंबई, ता. २२ : यंदा मार्च महिन्याच्या पहिल्याच मंगळवारी (ता. ३) खग्रास चंद्रग्रहण होणार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबादेवी मंदिर सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत केवळ दर्शनासाठी खुले ठेवण्यात येणार आहे.

ग्रहण वेधारंभ सकाळी १० वाजता होईल. ग्रहण प्रारंभ (स्पर्श) दुपारी ३.३० वाजता होणार असून, खग्रास स्थितीची सुरुवात सायंकाळी ४.३४ वाजता होईल. खग्रास स्थिती समाप्ती सायंकाळी ५.३० वाजता होईल, तर ग्रहण समाप्ती (मोक्ष) सायंकाळी ६.४६ वाजता होणार आहे. मंदिरातील नियमित कार्यक्रमांनुसार मंगला आरती सकाळी ४ वाजता, महाआरती सकाळी ८ वाजता आणि सायंकाळी महाआरती (भोग आरती) रात्री ८ वाजता पार पडणार आहे. तसेच पार्श्व पौर्णिमा नवचंडीचा कार्यक्रम सकाळी ५ ते ८.३० या वेळेत आयोजित करण्यात आला आहे.

ग्रहणाच्या दिवशी कोणत्याही प्रकारचा प्रसाद भक्तांकडून स्वीकारला किंवा अर्पण केला जाणार नाही, अशी माहिती श्री मुंबादेवी मंदिर विश्वस्त निधीचे व्यवस्थापक हेमंत पु. जाधव यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Buldhana Shivaji Maharaj Statue Row : चिखला गावचे फरार सरपंच Ganesh Kakad कोण? पहिल्यांदाच समोर येत व्हिडिओद्वारे दिली प्रतिक्रिया

SL vs ENG, T20 WC: W,W,W,W,W ! श्रीलंकेचा निम्मा संघ ३४ धावांत तंबूत; इंग्लंडच्या पार्टटाईम फिरकीपटू विल जॅक्सने वाढवली डोकेदुखी

Mumbai Traffic: मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी वाहतुकीवर कडक निर्बंध! अनेक रस्ते बंद; तर पार्किंगवर बंदी, मार्गदर्शक तत्त्वे काय?

Railway News: ट्रेन तिकीट बुक करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! आयआरसीटीसीकडून मोठे बदल; प्रवाशांना दिलासा, नवे अपडेट काय?

माओवाद्यांचा सर्वोच्च नेता थिप्परी तिरुपती उर्फ देवजीसह तेलंगणात शरण; दहा कोटींचे होते बक्षीस

SCROLL FOR NEXT