मुंबई

बदलापूर प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई

CD

बदलापूर प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई
आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची माहिती
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २२ : स्त्री-बीजाची तस्करी करणाऱ्या आरोपींना शुक्रवारी (ता. २०) पोलिसांकडून अटक करण्यात आली. त्यानंतर या घटनेची गंभीर दखल घेत, बदलापुरातील प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश आबिटकरांनी आरोग्य विभागाच्या संचालकांना दिले असून, दोन ते तीन दिवसांत प्राथमिक अहवाल सादर करण्याच्या सूचनादेखिल देण्यात आल्या आहेत. अहवालानुसार दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, अशी स्पष्ट भूमिका आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी व्यक्त केली.
स्वातंत्र्यवीर सेवा प्रतिष्ठानतर्फे गडकरी रंगायतन येथे आयोजित ‘आनंदोत्सव २०२६’ कार्यक्रमासाठी ते शनिवारी (ता. २१) सायंकाळी ठाण्यात आले होते. त्याच दिवशी सकाळी बदलापूरमध्ये स्त्री-बीजाची तस्करी होत असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला होता. याप्रकरणी तीन महिला आरोपींना अटक करून त्यांंच्याकडून संबंधित साहित्य ताब्यात घेतले होते. हे धक्कादायक प्रकरण उघडकीस आल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, की पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या अनुषंगाने आरोग्य विभागाकडून स्वतंत्र तपास केला जात आहे. वस्तुस्थिती समोर आल्यानंतर संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. व्यवस्थेतील त्रुटींवर काटेकोर कारवाई होईल, असे आश्वासनही त्यांनी दिले आहे.

पोलिसांकडून कसून तपास
आरोपींना बुधवार (ता. २५)पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे या दिवसांत आरोपींची सखोल चौकशी करून या रॅकेटचे धागेदोरे उलगडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यामुळे चौकशी पूर्ण झाल्यानंतरच या प्रकरणाचा पूर्ण उलगडा केला जाईल, असे बदलापूर पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Budget 2026: अजित पवारांनी अर्थसंकल्पासाठी प्रचंड मेहनत घेतली होती, पण दुर्दैवाने ही जबाबदारी माझ्यावर आली - देवेंद्र फडणवीस

T20 WC, IND vs SA: बुमराह-अर्शदीप ऑन फायर! पॉवर-प्लेमध्ये दक्षिण आफ्रिकेला दिले ३ धक्के; पाहा Video

Shegaon Temple: राष्ट्रपतींच्या दौऱ्यामुळे शेगावातील श्रींचे मंदिर भक्तांसाठी राहणार बंद; सुरक्षेच्या दृष्टीकोणातून खबरदारी!

MLA Car Bomb Attack : आमदार शौकत मोल्ला यांच्या कारवर बॉम्ब हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ!

T20 World Cup Group 2 Standing: इंग्लंडच्या विजयाने सुपर ८ च्या गटात मोठा उलटफेर; श्रीलंकेसह पाकिस्तानचंही वाढलं टेंशन; जाणून घ्या उपांत्य फेरीचं समीकरण

SCROLL FOR NEXT