अंबरनाथ, ता. २२ (वार्ताहर) : शिवाजीनगर पोलिस ठाणे हद्दीत बंगल्याची राखण करण्यासाठी ठेवलेल्या वॉचमननेच आपल्या कुटुंबीयांच्या मदतीने ७२ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरातून १५ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज चोरल्याची घटना समोर आली आहे. कल्याण पश्चिम येथील माधवबाग गौशाला लेन परिसरात राहणाऱ्या कुसुम ठक्कर यांचा अंबरनाथ पूर्वेला ‘वृंदावन’ नावाचा बंगला आहे. या बंगल्याच्या देखभालीसाठी त्यांनी बहादूर घासी भोगता (मूळ रा. झारखंड) याला वॉचमन म्हणून नियुक्त केले होते. जून २०२४ ते ३ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत बहादूरने ठक्कर यांच्या विश्वासाचा गैरफायदा घेतल्याचे तपासात उघड झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बहादूरने पत्नी शालू भोगता; तसेच आकाश आणि त्याच्या पत्नीसोबत संगनमत करून बंगल्यातील विविध कपाटांचे कुलूप उघडले. त्यातून सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम आणि महागड्या साड्या असा ऐवज टप्प्याटप्प्याने चोरून नेला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर कुसुम ठक्कर यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी बहादूर घासी भोगता, शालू भोगता, आकाश व त्याच्या पत्नीविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. या प्रकरणात एकूण १५ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याची नोंद आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.