तुर्भे, ता. २२ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिकेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत स्थायी समिती सदस्यांसह इतर सर्व समित्यांवर पक्षीय बळानुसार सदस्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. दरम्यान, परिवहन समिती सदस्यांसाठी भाजपकडून १२ अर्ज दाखल झाले आहेत. शुकवारी (ता. २०) पार पडलेल्या सभेत हा विषय न घेतल्याने सोमवारी (ता. २३) या सदस्यांचा निर्णय लागणार आहे.
नवी मुंबई महापालिका निवडणूक पार पडताच महापौर, उपमहापौर निवडीनंतर पहिल्या महासभेकडे नवी मुंबईकरांचे लक्ष लागले होते. या सभेत सभागृहनेता, विरोधी पक्षनेता, स्थायी समिती सदस्य, परिवहन समिती सदस्य यांसह इतर समितीच्या सदस्यांची नेमणूक करण्यात येणार होती. त्या धर्तीवर भाजप आणि शिवसेनेने सभागृहातील तौलनिक संख्याबळानुसार सदस्यांची नावे दिली होती; मात्र परिवहन समितीच्या १२ जागा असताना भाजपने १२ अर्ज दाखल केले आहेत, तर शिवसेनेने पक्षीय बळानुसार पाच अर्ज दाखल केले आहेत. शुक्रवारच्या सभेत परिवहन समिती सदस्य निवडीचा विषय होता; मात्र हा विषय पुढे ढकलत अन्य सर्व समित्यांवर सदस्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. परिवहन समिती सदस्य निवडीचा विषय सोमवारी घेण्यात येणार आहे. त्यामुळे भाजप आपले पाच अर्ज मागे घेऊन परिवहन समिती सदस्यांची नेमणूक तौलनिक संख्याबळानुसार बिनविरोध करणार की सभागृहात कुठली नवीन खेळी करणार, याकडे नवी मुंबईकरांच्या नजरा लागल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.