मुंबई

विकासाचा अर्थसंकल्प

CD

बदलापूर, ता. २२ (बातमीदार) : कुळगाव-बदलापूर नगर परिषदेच्या इतिहासात प्रथमच सर्वसाधारण सभा तब्बल रात्री ८ वाजेपर्यंत चालल्याची नोंद झाली. शहराच्या भावी विकासाचा पाया ठरणारा अर्थसंकल्प हा या दीर्घ बैठकीचा केंद्रबिंदू ठरला. खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेल्या या सभेत शहराच्या विकासाशी निगडित तब्बल ५० विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
सभेदरम्यान मुख्याधिकाऱ्यांनी आगामी आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प नगराध्यक्षा रुचिता घोरपडे यांच्या समोर सादर केला. उत्पन्न-खर्चाचे संतुलित नियोजन, विविध विकासकामांसाठी करण्यात आलेल्या तरतुदी, करसवलतींचा प्रस्ताव, तसेच मूलभूत नागरी सुविधांबाबतची मांडणी यावर नगरसेवकांनी बारकाईने चर्चा केली. काही सदस्यांनी अर्थसंकल्पात सुधारणा सुचवत शहराच्या वाढत्या गरजांचा विचार करण्याची मागणी केली. हा अर्थसंकल्प पुढील टप्प्यात स्थायी समितीसमोर सविस्तर चर्चेसाठी ठेवण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
या ऐतिहासिक बैठकीत अर्थसंकल्प कोणतेही वादविवाद न होता सकारात्मक वातावरणात मांडला गेला, ही विशेष बाब ठरली. ५० टक्के करमाफीचा प्रस्ताव, शहरातील आठवडी बाजारांमुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचा विषय, स्थानिक भाजी विक्रेत्यांच्या अडचणी, प्रस्तावित मेट्रो प्रकल्पासाठी आर्थिक तरतूद, तसेच पाणीपुरवठा योजनेच्या बळकटीकरणासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर सखोल चर्चा झाली. या सर्व विषयांचा थेट संबंध अर्थसंकल्पाशी असल्याने सदस्यांनी आपापली मते नोंदवत प्रशासनाकडून ठोस कृती आराखड्याची अपेक्षा व्यक्त केली.

सत्ताधारी भाजप-राष्ट्रवादी आघाडी; तसेच विरोधी शिवसेना पक्षातील नगरसेवकांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अर्थसंकल्प महत्त्वाचा असल्याचे अधोरेखित करत सकारात्मक भूमिका घेतली. नियोजन समिती सभापती संभाजी शिंदे, नगरसेवक शरद तेली, राजेंद्र घोरपडे तसेच शिवसेना गटनेते श्रीधर पाटील यांनी सर्वसाधारण सभेतील वेळ हा शहराच्या प्राधान्याच्या प्रश्नांवर प्रभावीपणे वापरला गेला पाहिजे, असा मुद्दा उपस्थित केला. विकासकामांमध्ये पारदर्शकता व लोकाभिमुखता राखण्यावरही त्यांनी भर दिला.

अर्थसंकल्पाची २६ फेब्रुवारीला मंजुरी
२६ फेब्रुवारीला होणाऱ्या पुढील सर्वसाधारण सभेत अर्थसंकल्पाची अंतिम मांडणी करून मंजुरी घेण्यात येणार आहे. ३ मार्चपासून तो प्रत्यक्ष अंमलात आणला जाणार आहे. त्यामुळे आगामी आर्थिक वर्षात शहराच्या पायाभूत सुविधा, नागरी सेवा व विकासकामांना नवे गतिमान मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar CM: बिहारचा नवा मुख्यमंत्री ठरला! 'या' नावावर शिक्कामोर्तब, अधिकृत घोषणा संध्याकाळी

Ayushman Bharat Scheme Update: आयुष्मान भारत योजनेत मोठा बदल! मोदी सरकारमुळे मिळणार ₹10 लाखांपर्यंत मोफत उपचार

IPL 2026: 'भारतात यशस्वी ठरलेल्या लोकांकडून शिकतोय अन् नोट्स घेतोय...' पंजाबच्या मॅचविनरने उघड केलं यशाचं गुपित

Maoist Song Dance Pune: पुण्यातील वसतिगृहात माओवादी आशय असलेल्या गाण्यावर नृत्य; Video Viral

SBI Whatsapp : स्टेट बँकेत अकाऊंट आहे? तुमच्यासाठी मोठी खुशखबर; घरबसल्या व्हॉट्सॲपवर होणार सगळं काम, पाहा काय आहे नवी सुविधा

SCROLL FOR NEXT