मुंबई

जळालेल्या अवस्थेतील महिलेचा मृतदेह आढळला

CD

जळलेल्या अवस्थेतील
महिलेचा मृतदेह आढळला

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २२ ः कल्याण रेल्वे स्थानक परिसरात रविवारी (ता. २२) सकाळच्या सुमारास जळलेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. या महिलेने आत्महत्या केली की तिचा मृत्यू घातपाताने झाला, याचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करण्यात येत आहे. स्थानिकांनी माहिती दिल्यानंतर महात्मा फुले चौक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.

कल्याण पश्चिमेचा रेल्वे स्थानक परिसर नेहमी गजबजलेला असतो. त्याच परिसरात सांडपाण्याचा मोठा नाला आहे. नाल्याचा बराचसा भाग नागरिकांनी टाकलेल्या कचऱ्याने भरलेला आहे. आजूबाजूला पत्रे लावलेल्या या नाल्यातून सकाळच्या सुमारास उग्र दुर्गंधी सुटली होती. काही पादचाऱ्यांनी वाकून पाहिले असता नाल्यात १२-१५ फूट खाली महिलेचा मृतदेह जळलेल्या अवस्थेत आढळून आला. स्थानिक नागरिकांनी तत्काळ ही माहिती पोलिसांना दिल्यानंतर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. अग्निशामक दलाच्या जवानांची मदत घेऊन नाल्यातून मृतदेह बाहेर काढण्यात आला असून, परिसरातील दुकानांना लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांतील फुटेजच्या तपासणीसह स्थानिकांचीदेखील चौकशी करण्यात येत आहे. महिलेचा मृतदेह तपासणीकरिता कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर स्थानक परिसरात काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

घातपात की आत्महत्या?
प्राथमिक माहितीनुसार, ही महिला फिरस्ता अर्थात बेवारस असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. एकीकडे रात्रीच्या सुमारास या महिलेला अज्ञात व्यक्तींनी नाल्यात ढकलून तिच्यावर ज्वालाग्राही पदार्थ टाकून जाळले असावे, असा पोलिसांचा अंदाज आहे. तर दुसरीकडे हा प्रकार आत्महत्येचा आहे की घातपाताचा, हे अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs SA: बुमराह-अर्शदीपची भेदक गोलंदाजी; पण मिलर-ब्रेव्हिसच्या जोडीनं द. आफ्रिकेला तारलं; भारतासमोर मोठं लक्ष्य

Pune Crime: दौंडमध्ये ८०५ लीटर गावठी दारू जप्त; राज्य उत्पादन शुल्कची कारवाई, पाेलिसांचा संशय बळावला अन्..

Karad Crime: कऱ्हाडनजीक तीन बांगलादेशी घुसखोरांना अटक; मुढेगावात सहा महिन्यापासून वास्तव्य, बनावट आधारकार्ड अन् बरच काही..

Latest Marathi News Live Update : कोल्हापूर दाजीपूर फोंडा घाट परिसरात तुफान पाऊस

Nagpur Crime: पेपरफुटी रॅकेट उघड! नागपूरात शिकवणी संचालकासह विद्यार्थी गजाआड; बरच काही येणार समोर, संशयाची सुई बोर्डाकडे?

SCROLL FOR NEXT