मुंबई

नवी मुंबईत बेकायदेशीर दत्तक व्यवहार उघड; नवजात बालकाची सुटका

CD

बेकायदा दत्तक व्यवहार उघड
नवी मुंबईत नवजात बालकाची सुटका

तुर्भे, ता. २२ (बातमीदार) : कोपरखैरणेत नवजात बालकाच्या बेकायदा दत्तक व्यवहाराचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. महिला व बालविकास विभागाच्या चाइल्ड हेल्पलाइन ठाणे आणि कोपरखैरणे पोलिस ठाणे यांच्या संयुक्त कारवाईत बालकाची रविवारी (ता. २२) सुरक्षित सुटका करण्यात आली.
विश्व हिंदू परिषद संस्थेकडून जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, ठाणे यांना या प्रकरणाबाबत तक्रार प्राप्त झाली होती. नवजात बालकाची कायदेशीर दत्तक प्रक्रिया न राबवता व्यवहार होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर प्रशासनाने तातडीने कारवाईचे आदेश दिले.

धाड टाकताच प्रकार उघड
महिला व बालविकास विभाग, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, ठाणे चाइल्ड हेल्पलाइनचे प्रतिनिधी आणि पोलिस पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकला. कारवाईदरम्यान बालकाची जन्मदाती माता तसेच ज्यांच्याकडे बालकाचा ताबा देण्यात आला, ते सर्वजण घटनास्थळी आढळून आले. सर्व संबंधितांना चौकशीसाठी पोलिस ठाण्यात आणून घटनेची नोंद करण्यात आली आहे.

बालकाला तात्पुरता निवारा
बालकल्याण समिती ठाणे यांच्या मौखिक आदेशानुसार, नवजात बालकाची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून सुरक्षिततेच्या दृष्टीने बालकाला विश्व बालक ट्रस्ट, नेरूळ येथे ठेवण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून बालकांच्या दत्तक प्रक्रियेत सहभागी असलेल्या व्यक्तींवर कठोर कारवाई होणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT